DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी अकिल शहा
साक्री: – लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त साक्री येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.साक्री पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श नगर येथील बुद्धविहार परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आदर्श नगर बुद्धविहार परिसरात आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमास साक्रीचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, उद्देशिका आणि प्रत्येक नागरिकांच्या जीवनातील त्याचे स्थान याबद्दल सविस्तर माहिती दिली.संविधानाने दिलेल्या हक्कांबद्दल आणि कर्तव्यांबद्दल त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी संविधानाच्या मूल्यांचे जतन आणि प्रसार करण्याच्या गरजेवर जोर देण्यात आला. उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधानाप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.
संविधान दिनाचा ७५ वा दिवस ‘अमृत महोत्सव’ म्हणून साजरा होत असताना,साक्री येथील या कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण झाली आणि हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक दिपक
वळवी,प्रा.कैलास वाघ,मिलींद बच्छाव,कमलाकर मोहिते,डी.एम.मोहिते,नानाजी मोरे,आर,डी.वेंन्दे,आर.डी.साळवेअशोक पानपाटील,नाना वाघ, जे.डी.वाघ,मुख्यध्यापक बोदडे सर,जितेंद्र पिंपळे,सुभाष मोरे, कमलेश मोहिते,मेघराज पिंपळे, रवींद्र मोरे,भैय्या वाघ,संजीव मोरे,पंडित अहिरे,शरद वाघ, गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी शांतीलाल पाटील, संतोष मोरे,मंडळ अधिकारी झोडगे,तलाठी रामचंद्र जाधव, आदींसह या ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर,संविधान प्रेमी नागरिक तसेच रमाई महिला मंडळ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



