नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पिंपळनेर पोलिसांची धडक कारवाई, वाहनासह साडेतीन लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी : साकिब सैय्यद

धुळे :- पिंपळनेर, जि. धुळेपिंपळनेर पोलिसांनी वेळीच सापळा रचून अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह सुमारे ३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मद्यतस्करी रोखण्यात यश मिळवले.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एमएच 03/एडब्ल्यू 3893 या क्रमांकाच्या वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून १ लाख ९२ हजार रुपयांची विदेशी दारू आढळून आली.
वाहनचालक विनायक सखाराम राऊत (वय 45, रा. सिताडीपाडा पो. वार्सा ता. साक्री) याची चौकशी करण्यात आली असता त्याने हा दारूसाठा राकेश जाधव (रा. पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी वाहनासह संपूर्ण मद्यसाठा जप्त केला.
या प्रकरणी दोघांविरुद्ध पिंपळनेर पोलिसांत महा. प्रोहिबिशन अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सपोनि किरण बर्गे, उपनिरीक्षक विजय चौरे, पीएसआय भूषण शेवाळे, कांतीलाल अहिरे, योगेश महाले, रविंद्र सूर्यवंशी व प्रविण धनगर यांच्या पथकाने केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!