नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणा-या नराधमा विरूद्ध कठोर कारवाईची मागणी तीव्र झाली

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी — नारायण कांबळे

कोल्हापूर:- इचलकरंजी शहापूर, मधील पोक्सो गुन्हा प्रकरणी दुसऱ्या दिवशीही शहापूर परिसरातील नागरिक व महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया ऊमटल्या. त्याचे संतप्त पडसाद आज पाहायला मिळाले. संशयित नराधमाला कठोर शासन व्हावे. त्याचे वकील पत्र कोणीही घेऊ नये. पीडितेला न्याय मिळावा. तसेच या घटनेचा निषेध करीत महिलांनी सायंकाळी शहापूर चौकातील रस्त्यावर ठिय्या मारून रास्ता रोको केला. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नावे असलेले निवेदन पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी रास्ता रोको ठिकाणी येऊन स्वीकारले.
इचलकरंजी शहापूर मधील बौद्ध समाजाच्या वतीने बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. संपूर्ण समाजाने पीडितेच्या घरी जाऊन धीर दिला. पूर्ण समाज तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. नराधमाला कठोर शासनासह फाशीची शिक्षा व्हावी अन्यथा आम्ही रस्त्यावरची लढाई लढू अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी उमटल्या यानंतर समाजाचे लोक शहापूर चौकात आले. त्यांनी निषेधाच्या घोषणा देत रस्त्यावर ठिय्या मारला. चारही रस्त्याची वाहतूक ठप्प होऊन रांगा लागल्या. यावेळी अबालवृद्धांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बालिका अत्याचार प्रकरणात कोणीही राजकारण आणू नये. दबाव न घेता तपास करावा व तसे दोषारोपपत्र सादर करावे. पिडीत कुटुंबाची तक्रार न घेता त्यांना ताटकळत ठेवून चालढकल करणाऱ्या पोलीस अधिकारी यांचे निलंबन करावे तसेच अशा प्रकारास वेळीच प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. असे प्रकार पुन्हा घडल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!