नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापुरात शाळा महाविद्यालय परिसरात नियमभंग करणाऱ्या २१७ वाहनचालकांवर कारवाई २,१२,४०० दंड वसूल.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संजय दिंडे

कोल्हापूर:- कोल्हापूर शहर वाहतूक विभागाने शाळा आणि महाविद्यालय परिसरात वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी मोहीम राबवून कडक कारवाई केली. बिना परवानाधारक वाहन चालक, अल्पवयीन चालक, बिनाकारण ट्रिपल सीट, मोबाइलवर बोलत वाहन चालवणे अशा गंभीर उल्लंघनावर विभागाने २१७ वाहनांवर कारवाई करून एकूण २,१२,४०० रुपये दंड वसूल केला.वाहतूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक विद्यार्थी, नागरिकांकडून शाळा–महाविद्यालय परिसरातील वाहतूक नियमभंगाबाबत तक्रारी येत होत्या. त्यानुसार विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान परवाना न घेता वाहन चालवणे १००००० रुपये,
अल्पवयीन चालक / पालकांवर कारवाई ५५००० रुपये,
ट्रिपल सीट १२,००० रुपये,
मोबाइलवर बोलत वाहन चालवणे १२,००० रुपये.
नंबर प्लेट न लावणे / चुकीची ३०,००० रूपये ,परवाना जवळ न बाळगणे २६,४०० रुपये असे
एकूण २१७ वाहनधारक यांच्यावर कारवाई करत २,१२,४०० दंड वसूल करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास पुढील काळातही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:47 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!