नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अपघातप्रकरणी आरोपीस 1 वर्ष कैद व 20 हजारांचा दंड

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – रविंद्र पवार

विटा : विटा–मायणी रोडवर 2016 साली झालेल्या गंभीर अपघातप्रकरणी आरोपी दिपक साताप्पा रानमाळे (रा. मांगेवाडी, राधानगरी) यास 1 वर्ष साधी कैद व 20,000 रुपये दंड अशी शिक्षा विटा येथील मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पल्लवी सुर्यवंशी यांनी सुनावली.

गुन्हा क्रमांक 187/2016 अंतर्गत दि. 16 मे 2016 रोजी झालेल्या अपघातात राजेंद्र माळी (45) व सुरज माळी (18), रा. माहुली यांचा मृत्यू झाला होता. तर विशाल सवने व तेजस्विनी सवने हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातात 5 लाखांचे नुकसान झाले होते.

तपास अधिकारी पीएसआय संभाजी महाडीक यांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी बाजू अभियोक्ता शारदा गायकवाड यांनी प्रभावीपणे मांडली, तर कोर्ट पैरवी पोहेकॉ गणी पठाण यांनी केली.
न्यायालयाने भा.द.वि. कलम 304(अ), 279, 337 व 427 अंतर्गत आरोपीस विविध कालावधीच्या कैद व दंडाच्या शिक्षा सुनावल्या.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:35 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!