नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मेडिकल इंजेक्शनचा गैरव्यवहार उघड – मेफेन्टर्माइन सल्फेटची ४० बॉटल्ससह १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त!

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर :- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मेफेन्टर्माइन सल्फेट या इंजेक्शनच्या बेकायदेशीर विक्रीचा मोठा पर्दाफाश करत ४० इंजेक्शन बॉटल्ससह तब्बल ₹१,१०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रातील काळाबाजार करणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.

पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. तपासादरम्यान एका संशयिताकडे मेफेन्टर्माइन सल्फेटचे साठवणूक व बेकायदेशीर विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. हा औषधप्रकार रुग्णालयात वापरासाठी असला तरी बाजारात चोरट्या मार्गाने विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली.

पथकाने छापा टाकत ४० इंजेक्शन बॉटल्स ताब्यात घेतल्या. मुद्देमाल न्यायालयीन पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. औषधांचे अवैध साठवण व विक्री करणाऱ्या रॅकेटचा तपास वेगाने सुरू असून, गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

या यशस्वी कारवाईसाठी पोलिस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदारांचे कौतुक होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!