DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – निवास गागडे
इचलकरंजी:- नेहरूनगर झोपडपट्टी येथील सुशीला पोवार यांच्या घराला लागून चालू घरगुती लाईट सर्विस वायरचा लोखंडी डांब गेले 33 ते 34 वर्षांपूर्वीचा असल्यामुळे तो खालून ते वरपर्यंत पूर्णपणे गंजून सढून कट झालेला होता. डांब पडण्याच्या मार्गावर आलेला होता. डांबाच्या आजूबाजूला असलेल्या चार-पाच कुटुंबांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत होते. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले होते.या गोष्टीचा विचार करून रवी रजपुते सोशल फाउंडेशन यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे सहाय्यक अभियंतांची भेट घेऊन निवेदनवाद्वारे ताबडतोब जुने डांब काढून नवीन डांब बसवून मिळणेसाठी निवेदन देण्यात आले. नेहरूनगर झोपडपट्टीतील नागरिकांनी तात्काळ विजेचा खांब बदलून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवि रजपुते यांचे आभार मानले. यावेळी धनाजी डोईफोडे, गणेश जाधव, प्रशांत कांबळे, निवास गागडे, अमित ठाणेकर,युवा नेते रोहित रजपुते, निलेश निंबाळकर, अशोक कदम, सर्जेराव पोवार, सुरेश हावळ, व भागातील महिला वर्ग उपस्थित होते.



