स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या सहा तासात गुन्हा उघड केला.
DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर :– दारूच्या नशेत शिवीगाळ झाली, वाद चिघळला आणि मित्रानेच मित्राचा गळा आवळून खून केला! कळंबा रिंगरोड परिसरात घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाचा पराकाष्ठेने घेतलेला छडा केवळ सहा तासांत उलगडत, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या.
सोमवारी पहाटे गोखले कॉलेज–हॉकी स्टेडियम रस्त्यालगत विश्वपंढरी समोरील फुटपाथवर इलेक्ट्रीक पोलला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळताच शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाला वेग दिला.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष तपास पथक उभारत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे व गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला. त्यानुसार अंमलदार योगेश गोसावी यांना राऊत कॉलनीतील मनिष जालिंदर राऊत (28) याच्यावर संशय असल्याची पक्की माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचत मनिषला पकडले.
चौकशीत उघड झाले की सिध्दु शंकर बनवी (20, राहणार वाशी नाका, कळंबा रिंगरोड) हा मनिषचा परिचित. दोघे जेवायला गेल्यानंतर दारूच्या नशेत वाद झाला. वादाच्या भरात सिद्धूने मनिषच्या आईचा उल्लेख करत शिवीगाळ केली आणि संतापाच्या भरात मनिषने फुटपाथवरील इलेक्ट्रीक पोलला लटकत असलेल्या केबलने सिद्धूचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.
ही संयुक्त कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक, जुना राजवाडा पोलिस ठाणे आणि शहर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कौतुकास्पद पद्धतीने पूर्ण केली. तपासात सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोसई जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, योगेश गोसावी, सुरेश पाटील, समीर कांबळे, रोहित मर्दाने, संतोष बरगे, परशुराम गुजरे, संजय हुंबे, हिंदुराव केसरे, महेश खोत, सतीश जंगम, संदीप बेंद्रे, महेश पाटील, सागर माने, विनायक चौगूले, प्रदीप पाटील, युवराज पाटील, अमित सर्जे आणि सतीश सूर्यवंशी यांच्या पथकांचा सहभाग होता.
कोल्हापूर पोलिसांनी दाखवलेली तातडी आणि गुन्हा उघड करण्याची चपळाई कौतुकास्पद!



