DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी – संदीप सकट
कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार बेकायदेशीर वर्तन व शस्त्र बाळगण्यास मनाई असताना, चंदगड पोलिसांनी हेरे चौक ते चंदगड दरम्यान ताम्रपर्णी नदीच्या पुलाजवळ मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गोवा बनावटीची दारू, एक तलवार, लोखंडी टॉमी आणि महिंद्रा कंपनीची XUV 500 कार असा एकूण १२ लाख १८ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपी जोतीबा वैजु चव्हाण (वय २९), संतोष मारुती चव्हाण (वय २८), आणि महांतेश मल्लाप्पा देसाई (वय २६), सर्व रा. मुरकुटेवाडी, ता. चंदगड.
आरोपींनी संगनमताने महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीच्या दारूच्या ४८ बाटल्या (DSP Black DELUXE WHISKY) आणि ४८ बाटल्या (GOLDEN ACE Blue Fine WHISKY) बेकायदेशीररित्या वाहतूक करत असल्याचे संशय आल्याने
पोलिसांनी वाहनाला थांबण्याचा इशारा केला आरोपींनी वाहन न थांबवता भरधाव वेगात चालवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून गाडी अडवली.गाडीमध्ये अंदाजे २८ इंच लांबीची वक्राकार तलवार आणि २१ इंच लांबीची लोखंडी टॉमी व दारू जप्त करण्यात आली.
जप्त मुद्देमाल मध्ये दारूच्या बाटल्या, तलवार आणि टॉमी
महिंद्रा XUV 500 कार (MH 04 FA 9459)१२,००,०००
एकुण १२,१८,१६० रुपये मुद्देमाल ताब्यात घेण्यात आले.
याबाबत फिर्याद पोलीस नाईक वसिम फारुक देसाई यांनी दिली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय वाडेकर करीत आहेत.ग्रामीण भागात अशाप्रकारे दारू आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक होत असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.



