DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर:- इचलकरंजी शेजारी तारदाळ परिसरात एका अल्पवयीन बालिकेवर (वय 8.6 वर्ष ) किराणा दुकान चालवणाऱ्यां व्यक्तीने गेल्या सहा महिन्यापासून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिस्किट ,चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून आरोपीने हे घृणास्पद कृती केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पिडितेच्या पालकांनी धाडसाने शहापूर पोलिसात ठाण्यात तक्रार दाखल केली असून तत्काळ पोलीसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे गु.र.नं.409/2025 भा.द.वि. कलम 74,78,79,351(2)(3) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 (POCSO Act )चे कलम 12 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आरोपी; दशरथ भाऊ सोनटक्के,रा. चौंडेश्वर कॉलनी ,तारदाळ ,ता. हातकणंगले, पिडीता; अंदाजे 8 वर्षे 6 महिने वयाची मुलगीही होती घटनास्थळी आरोपींचे किराणा दुकान, दशरथ भाऊ सोनटक्के वय 60 नेमके काय घडले ? पोलीसांना मिळाले माहिती नुसार ,आरोपी दशरथ भाऊ सोनटक्के हा किराणा दुकान चालवतो .त्याने मागिल सहा महिन्यांपासून सातत्याने पिडित अल्पवयीन मुलीला लक्ष्य केले, बिस्किट ,गोळ्या आणि चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तो तिला वारंवार दुकानात बोलवत असे या संधीचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता आरोपीने पुन्हा हे कृत्य केले गुन्हा उघडकीस हे संपूर्ण प्रकरण उघड झाल्यावर पिडितेच्या पालकांनी आरोपीकडे विचारणा केली. तेव्हा आरोपीने अजून काही केले नाही केल्यावर तुम्ही काय कारणार आहात असे उद्धट आणि उद्दाम उत्तर दिले .या उत्तराने संतप्त झालेल्या पालकांनी तत्काळ शहापूर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ संबंधित कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणांत पुढील तपास मा.पो.हे. कॉ. साबळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.आरोपीला लवकर अटक केली जाईल,अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.



