DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी. प्रा. नागेंद्र जाधव
कोल्हापूर:- चंदगड तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आयोजित फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालत या संकल्पनेतून “न्याय आपल्या दारी “हा शिबिरात्मक उपक्रम माणगाव येथील छ. शिवाजी हायस्कूल येथे गुरुवार दि. 4 डिसेंबर रोजी संपन्न झाला. कार्यक्रमातील प्रमुख अतिथी, मार्गदर्शक प्रसंगी बोलताना चंदगड येथील प्रथम वर्ग न्यायाधीश वामन जाधव यांनी भारतीयांचा सर्वोच्च कायदा म्हणजे संविधान असून भारतीय संविधानाची उद्देशिका, कायद्याचे राज्य, कायद्यापुढील समानता, सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य, धर्मनिरपेक्षता, समता आणि बंधुता या मूल्य तत्वाचे महत्व विशद केले.
मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलम 17 अस्पृश्यता निवारण, कलम 32 हा संविधानाचा आत्मा असून कलम 39 अ नुसार दुर्बल, आर्थिक मागास, वंचित घटकाना विधी सेवा मोफत देणे हॆ राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे सांगून केशवानंद भारती केस प्रकरणाचा संदर्भ देत संविधानाचा मूळ गाभा बदलता येणार नसल्याचा सर्वोच्च निकाल व शाहिदा बानू केस प्रकरणी अमर्याद काळासाठी आंदोलन करून शांतता व सुव्यवस्था बिघडवता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
ॲड.विठोबा जाधव यांनी चंदगड तालुक्यातील विधी सेवा केंद्राचे महत्व स्पष्ट करून पोकसो कायदा, प्रमुख तरतुदी, पालक, विद्यार्थी व शिक्षक यांची जबाबदारी सांगितली. चंदगड वकील बार असोसिएशन च्या अध्यक्षा ॲड.जी. एस. पाटील यांनी घरगुती हिंसाचार, कौटुंबिक छळ कायद्याची माहिती देवून उपस्थित महिलांवर्गाला आत्मचिंतन करण्यास भाग पाडले.
पाहुण्यांचा परिचय व मनोगत पर भाषणात प्रशांत मेटकूपी यांनी या विधी सेवा शिबिराची गरज, महत्व सांगून गावातील नागरिकांना आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक के. बी. नाईक होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. एस. चिगरे, सूत्रसंचालन पी. के पाटील तर आभार आर. व्ही. मोहिते यांनी मानले.
कार्यक्रमासाठी व्यासपीठावर चंदगड सरकारी वकील ॲड.संगीता पाटील, अध्यक्षा ॲड. जी. एस. पाटील, उपाध्यक्ष ॲड.भारती कांबळे, न्यायालयीन कर्मचारी,ॲड.एम. जी. सुतार,ॲड.प्रवीण डंगारी, ॲड.समीर यरोळकर आदी मंडळी उपस्थित होती.
चंदगड तालुक्यातील उल्लेखनिय, अद्वितीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका विधी सेवा समिती, माणगाव महिला सरपंच, ग्रामविकास अधिकारी, विधी सेवेत कार्यरत असलेले प्रशांत मेटकुपी, शाळा प्रशासनातील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद बी. एस. चिगरे, व्ही. एल. कांबळे, पी. के. पाटील, ए. एन. बोकडे, एम. पी. कोले, आर. एम. गारगुटकर, श्रीमती एस. एम. विभुते व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता संविधान उद्देशिका वाचनाने झाली. सदर शिबीराला गावातील शेतकरी, नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी पालकवर्गाने मोठया प्रमाणात उपस्थिती लक्षणीय होती.



