नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

लोक न्यायालयात तडजोडीने खटले मिटवावेत. न्यायमूर्ती. व्ही. एस. अग्रवाल.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी- प्रा. नागेंद्र जाधव

कोल्हापूर – चंदगड तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आयोजित फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालत या संकल्पनेतून “न्याय आपल्या दारी “हा उपक्रम कोरज ता. चंदगड येथील ग्रामपंचाय

त कार्यालयात बुधवार दि. 3 डिसेंबर रोजी संपन्न झाला. कार्यक्रमातील प्रमुख अतिथी, मार्गदर्शक,विधी सेवा समितीचे अध्यक्ष व पॅनेल प्रमुख म्हणून बोलताना चंदगड येथील प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही. एस. अग्रवाल यांनी चंदगड न्यायालयातील प्रलंबित खटल्यांविषयी खेद व्यक्त करत असे विविध प्रलंबित खटले लोक अदालतीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी पक्षकारांनी पुढाकार घेऊन तडजोडीने प्रकरणे मिटवावीत असे आवाहन करून लोक अदालत ही वाद मिटविण्याची एक पर्यायी व सामंजस्यावर आधारित यंत्रणा असून प्रलंबीत खटले सोडविण्याचे व्यासपीठ असल्याचे सांगितले.
विधी सेवा समिती पॅनेल सदस्य ॲड.विठोबा जाधव यांनी चंदगड तालुक्यातील विधी सेवा केंद्राचे महत्व स्पष्ट करून कामकाज कसे चालते याची माहिती दिली. चंदगड वकील बार असोसिएशन च्या अध्यक्षा ॲड.सी.एस. पाटील यांनी दिवाणी व फौजदारी डाव्या बाबत मुद्देसूद विवेचन केले. ॲड. अनंत कांबळे यांनी घरगुती हिंसाचार, कौटुंबिक छळ कायद्याची माहिती देवून वाढत्या खटल्यांबाबत चिंता व्यक्त केली. लिपिक अमित रेडकर यांनी लोक न्यायालयाचा निर्णय अंतिम व सर्व पक्षांवर बंधनकारक असल्याचे सांगितले.
पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक प्रशांत मेटकुपी यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक अशोक चिंचणगी यांनी केले.
कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष न्यायमूर्ती व्ही. एस. अग्रवाल, सरकारी वकील ॲड.नीता चव्हाण,ॲड. सी. एस. पाटील, उपाध्यक्ष ॲड.भारती कांबळे,ॲड. हेमलता मादार,ॲड.विठोबा जाधव,ॲड.अनंत कांबळे,ॲड.ए. डी. ओऊळकर, कार्यालयीन कर्मचारी सुमित टिपुगडे, अमित रेडकर, किरण पाटील, पी. जी. मेटकुपी, महेश पाटील यांची उपस्थिती होती.
चंदगड तालुक्यातील उल्लेखनिय, अद्वितीय कार्यक्रमाला कोरज परिसरातील शेतकरी, नागरिक, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी खोत, तंटामुक्त समिती सदस्य यासंह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. कोरजचे लोक नियुक्त सरपंच अनंत कांबळे यांनी कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करत आभार मानले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:09 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!