नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वाडी येथे समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध शिबिरांचे यशस्वी आयोजन

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – संदिप अहिरे

शिंदखेडा :- (वाडी) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वाडी ग्रामपंचायतीत विविध उपक्रमांचे शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सरपंच सुवर्णसिंग गिरासे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत वाडी आणि प्रो. रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विद्यार्थ्यांनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले.
आरोग्य शिबिरात २५ NSS विद्यार्थ्यांनी गावातील १५० नागरिकांची मोफत तपासणी केली. यामध्ये बीपी, हिमोग्लोबिन, वजन, BMI, शुगर, ब्लड ग्रुप आदी तपासण्या करण्यात आल्या. वाढत्या स्तन कर्करोगाच्या पार्श्वभूमीवर महिलांना जागृतीपर मार्गदर्शनही देण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. लोकेश गुरव व प्रा. प्रज्ञा मोरे यांचे सहकार्य लाभले.
दरम्यान, गावात ऍग्री स्टॉक नोंदणी शिबिरही आयोजित करण्यात आले. कृषी विभागाचे सहाय्यक दिनेश साळुंखे आणि महसूल विभागाचे तलाठी गिरणार आप्पा यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित नोंदण्या पूर्ण केल्या. वाडी गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याचबरोबर जागतिक मृदा दिनानिमित्त गावातील सर्व शेतकऱ्यांची माती परीक्षण करून त्यांना मातीचे रिपोर्ट कार्ड वाटप करण्यात आले. या रिपोर्ट कार्डमुळे शेतकऱ्यांना जमिनीतील पोषक घटकांची माहिती मिळून पिक निवड व खत व्यवस्थापनासाठी अचूक मार्गदर्शन मिळणार आहे.
या उपक्रमांबद्दल शेतकऱ्यांनी सरपंच सुवर्णसिंग गिरासे यांचे आभार मानत, “कधी नव्हे असा मोलाचा उपक्रम राबवून आम्हाला मार्गदर्शन मिळाले,” अशी भावना व्यक्त केली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी संकल्प प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सुनील मोरे, सुनील नगराळे, भारत गिरासे, राजेंद्र गिरासे, दिनेश गिरासे, सोनू गिरासे, कदमसिंग गिरासे, धना गिरासे, चतुर गिरासे, दिलीप बेडसे आणि मित्रपरिवार यांनी मोलाचे योगदान दिले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!