DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – संदीप सकट
चंदगड – सांबरे येथे दत्तजयंती निमित्त देण्यात आलेल्या महाप्रसादातून अन्न विषबाधेची घटना समोर आली असून परिसरातील अनेक नागरिक, महिला आणि लहान मुलांची प्रकृती बिघडली आहे. अचानक उलटी, जुलाब, चक्कर अशी लक्षणे दिसू लागल्याने पीडितांना तातडीने नेसरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक सुनीलदादा कापणकर, श्रेहल नागराळ, चेतन शेरगावकर आणि मयूर गावडे यांनी तातडीने रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णांची विचारपूस करून उपचार प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी डॉ. चंद्रकांत देसाई व डॉ. यदवगुड यांनी अन्नविषबाधित रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांबाबत मार्गदर्शन केले तसेच आयुर्वेदिक औषधोपचारांद्वारे रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले.
समाजसेवक सुनीलदादा कापणकर यांनी रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांना दिल्या जात असलेल्या उपचारांबाबत विश्वास दिला. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आश्वासन दिले.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून अन्नविषबाधेचे नेमके कारण काय याचा तपास प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



