नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा 28 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – निवास गागडे, इचलकरंजी

इचलकरंजी : सम्राट अशोक नगर येथील महाराष्ट्र हौसिंग सोसायटीच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा 28 वा वर्धापन दिन 6 डिसेंबर 2025 रोजी अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष रवि रजपुते, तानाजी पवार, राष्ट्रगीत संपादक अजय जाधव, माजी नगरसेवक मनोज साळुंखे, दिलीप मुथा व किरण पवार यांच्या उपस्थितीत महाआरती करून वर्धापन दिनाचा शुभारंभ झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान गीताद्वारे अभिवादन करण्यात आले.महाराष्ट्र हौसिंग सोसायटीमध्ये 50 सभासद असून चेअरमन धनाजी डोईफोडे व व्हाईस चेअरमन गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा सुंदर जीर्णोद्धार पूर्ण झाला आहे. भटजी व्यवस्थापन, सकाळ–संध्याकाळी आरती-भजन, मंदिर परिसराची स्वच्छता, दानपेटीचा हिशोब, हनुमान जयंतीचे पाच दिवसांचे नियोजन, महाप्रसादाची व्यवस्था अशा सर्व कामांची काटेकोर जबाबदारी सोसायटीकडून पार पडते. तसेच सभासदांच्या अडचणी सोडवण्यासाठी दरमहा बैठक घेतली जाते. सोसायटीच्या जागेत बांधलेले पाच गाळे भाडेतत्त्वावर देऊन इनकम सोर्स वाढवण्याचे उत्तम प्रयत्न सोसायटीकडून केले जात आहेत.
या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.इ.स.1967 मध्ये स्व. पांडुरंग बापू खोत यांनी आपल्या क्रेनद्वारे इचलकरंजी बसस्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिष्ठापना केली होती. त्याच परंपरेचा वारसा पुढे चालवत इ.स. 2025 मध्ये मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा ‘हिरा मूव्हर्स (खोत ग्रुप ऑफ क्रेन्स)’च्या राजू खोत, संजय खोत व अरुण खोत यांनी प्रतिष्ठापित केला.“वडिलांनी शिवरायांचा पुतळा उभारून इतिहासाची ज्योत पेटवली; मुलांनी धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा उभारून त्या तेजाला अधिक उजाळा दिला,” अशा शब्दांत प्रमुख पाहुण्यांनी खोत परिवाराच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांना शाल–पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. कार्यक्रमास सुकाणू समिती सदस्य दिलीप ढोकळे, धोंडीराम मांगलेकर, निवास गागडे, अमित ठाणेकर, अब्बास तेली, ह. भ. प. विष्णुपंत नेतले, बाबुराव भंडारे, अमोल फातले, प्रकाश खडके, भारत डोईफोडे, मधुसुदन पडियार, अतुल वाघे, संजय भूतदा, बाबुराव भंडारे,धोंडीराम वडार,अल्लाबक्ष बागवान,आयुब बागवान, पत्रकार प्रवीण हांडे, राजेश लाहोटी, भास्कर कांबळे, संतोष मांगलेकर, सुनील वडर, प्रवीण ठोबरे, कुमार हेरवाडे, सुरज नेतले तसेच परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाआरतीनंतर सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:02 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
22 %
11 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!