DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी निवास गागडे
कोल्हापूर:- आज माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन व उमेदवार धनाजी डोईफोडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन आगामी निवडणुकीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. मतदारसंघातील विकास कामे, स्थानिक प्रश्न व नागरिकांच्या अपेक्षा याविषयी सकारात्मकं चर्चा झाली. त्यावेळेस राजनंदनीचे स्पेशल गरम गरम चहा कांदा भजीचा आस्वाद घेतला आमदार प्रकाश आवाडे यांचे शाल टोपी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन ही भेट आगामी राजकीय समीकरणात महत्वपूर्ण ठरणार असून, विकासाच्या वाटचालीला बळकटी देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी स्थानिक कार्यकर्ते व समर्थक माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते, माजी नगरसेवक मनोज साळुंखे, महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीचे व्हाईस चेअरमन गणेश जाधव, निवास गागडे, अमित ठाणेकर, अमित पाडळे, अरुण खोत, किरण पवार, धोंडीराम मांगलेकर, अनिल ठाणेकर, शिवकुमार पाडळे, कुमार हेरवाडे, अलगोंडा पाटील, पत्रकार प्रवीण हांडे, अरुण मस्कर, लखन हेगडे, सनी निबाळकर व भागातील नागरिक उपस्थितीत होते.



