DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी अकिल शहा
साक्री: निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील घाणेगाव गावात दि. ०९/१२/२०२५ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेच्या सुमारास काही इसम हे तलवार, चाकु, लाठ्या काठयांसह गावात तसेच परिसरात शांतता भंग करुन दहशत निर्माण करीत आहेत अशी बातमी मिळाल्याने सद्याची महाराष्ट्रात जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगर परीषद/नगर पंचायत निवडणुका तसेच मा. जिल्हाधीकारी सो यांनी दिनांक ०१/१२/२०२५ ते दिनांक १५/१२/२०२५ पावेतो प्रतीबंधात्मक आदेश जारी केलेले आहेत. त्याअनुषंगाने सपोनि/मयुर भामरे सो यांनी पोहेकॉ/आर. यु. मोरे, पोकॉ/गौतम अहिरे. पोकॉ/सागर कांगणे, अशांना सदर घटनास्थळी तात्काळ रवाना केले सदर ठिकाणी इसम नामे १. भास्कर भिका कोळी, २. भाऊसाहेब उत्तम पाटील, ३. शानाभाऊ देवमन भिल सर्व रा.चिमठाणे ता. शिंदखेडा जि. धुळे हे घाणेगाव तसेच परीसरात हातात तलवार, चाकु, लाठ्या काठयांसह गावात तसेच परिसरात शांतता भंग करुन दहशत निर्माण करीत असतांना मिळुन आले. सदर इसमांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द निजामपुर पोलीस स्टेशनला गुरन ०३२२/२०२५ भारतीय हत्यार अधिनियम १९५९ कलम-४/२५ सह मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), (२) चे उल्लंघण १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांचे कडुन गुन्हयात वापरलेली तलवार, चाकु लाकडी दांडका असे जप्त करण्यात आले असुन मा. वरीष्ठांच्या आदेशांन्वये पुढील कारवाई करीत आहेत.
सदरची कारवाई मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. डॉ. अजय देवरे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा.एस.आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि/श्री मयुर भामरे, सपोनि/प्रियदर्शनी थोरात, असई कलीम शेख, असई वळवी, पोहेकॉ/नारायण माळचे, पोहेकॉ/रतन मोरे, पोहेकॉ/नागेश्वर सोनवणे, पोहेकॉ/प्रदिप आखाडे, पोना/खंडेराव पवार, पोकॉ/श्रीराम पदमर, पोकॉ/प्रवीण पवार, पोकों/ राकेश बोरसे, पोकॉ/सागर थाटशिंगारे, पोकॉ/गौतम अहिरे, पोकॉ/कृष्णा भिल, पोकों/परमेश्वर चव्हाण, पोकॉ/सुनिल अहिरे, पोकों/सागर कांगणे, पोकॉ/टिलु पावरा, चापोहेकॉ/मनोज देवरे यांनी केली आहे.



