DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी साकिब सैय्यद
पिंपळनेर (ता. साक्री) :— पिंपळनेर बसस्थानक आवारातून राष्ट्रीय परिवहन महामंडळाची टाटा सुमो (MH 06 BM 1325) ही सेवा वाहन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 9 डिसेंबर रोजी मध्यरात्रीनंतर उघडकीस आली. पिंपळनेर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत, दोन पथकांच्या मदतीने वाहनाचा शोध घेऊन केवळ काही तासांत वाहन आमळी परिसरातून ताब्यात घेतले. या प्रकरणात किरण जगन गायकवाड (वय 20, रा. आमळी) याला अटक करण्यात आली आहे.
घटना अशी घडली—
9 डिसेंबर रोजी रात्री साधारण 9.30 वाजता एसटी महामंडळाचे मार्ग तपासणी पथक टाटा सुमो गोल्ड वाहनासह पिंपळनेर बसस्थानकावर मुक्कामी पोहोचले. वाहन लॉक करून चालक व कर्मचारी विश्रांतीगृहात झोपले. पहाटे 3.30 च्या सुमारास चालक जगदिश दयाराम चौधरी (वय 57, रा. देवपूर धुळे) वाहन तपासण्यासाठी गेले असता वाहन जागेवरून गायब असल्याचे आढळले. तातडीने सहकाऱ्यांसह परिसरात शोध घेतला, परंतु वाहन मिळून आले नाही. याबाबतची तक्रार पिंपळनेर पोलिसांत दाखल करण्यात आली.
चोरलेल्या वाहनामध्ये मद्यप्राशन तपासणी यंत्र (किंमत 15,000 रुपये), खाते वाहन डायरी, G-12 पावती पुस्तक आदी वस्तू होत्या. पोलिसांनी केलेल्या तपासातून वाहन आमळी परिसरात असल्याची माहिती मिळताच दोन पथकांनी शोध मोहीम राबवून वाहनासह आरोपीला ताब्यात घेतले.
एकूण जप्त मुद्देमाल — 10 लाख 15 हजार रुपये
▪ टाटा सुमो गोल्ड – अंदाजे किंमत 10 लाख रुपये
▪ मद्यप्राशन तपासणी यंत्र – 15,000 रुपये
▪ डायरी व पावती पुस्तके – किंमत नोंद
ही कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली —
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल श्रीकांत धिवरे
उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे
कारवाई करणारे पथक —
सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे
पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे व त्यांचे सहकारी
पोलिसांच्या तात्काळ व शिताफीने केलेल्या कारवाईमुळे एसटी महामंडळाचे चोरीस गेलेले वाहन सुरक्षितपणे परत मिळाले आहे.



