नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पत्रकारांशी अपशब्द वापरणाऱ्या पीएसआय महेश गायतड यांच्या विरोधात निषेध करत पत्रकाराचे डीवायएसपीनां निवेदन

साक्री शहरात कायद्याच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्या पत्रकारांशी अपशब्द वापरणाऱ्या पीएसआय महेश गायतड यांच्या विरोधात निषेध करत पत्रकाराचे डीवायएसपी संजय बाबळे यांना निवेदन.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी अकिल शहा

साक्री :- साक्री पोलीस स्टेशनला पीएसआय पदी असलेले महेश गायतड यांनी पत्रकार शरद चव्हाण यांच्याशी शाब्दिक वाद घातला त्या वादासंदर्भात साक्री शहरातील पत्रकार बांधव पोलीस निरीक्षक याच्याशी चर्चा करण्यासाठी गेले असता, त्या प्रसंगी दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांना तो एक लगड्या आहे, त्याचा दुसरा पाय ही तोडेल अशी शिवीगाळ केली, या घटनेची चौकशी पत्रकार किशोर गादेकर यांनी प्रत्यक्ष महेश गायतड यांना भेटून खरे खोटे केले असता सहायक पोलीस उपनिरीक्षक गायतड यांनी शिवीगाळ केल्याचे मान्य केले, परंतु पत्रकार किशोर गादेकर यांचा पीएसआय यांच्याशी कोणतीही भेट नाही, काही कारण नाही तरी देखील मला शिवीगाळ का केली, यावेळी पत्रकार उमाकांत अहिरराव सोबत असताना उमाकांत अहिरराव यांना पीएसआय महेश गायतड यांनी शिवीगाळ करीत स्वतःचे शर्ट काढून पत्रकार उमाकांत यांच्या वरती गुंडगिरी प्रवृत्ती प्रमाणे काही कारण नसतांना हमला केला, या घटनेची माहिती पत्रकार तथा साक्री तालुका मराठी पत्रकार संघ प्रसिद्ध प्रमुख किशोर गादेकर यांनी PIS महेश गायतड यांच्या विरुद्ध साक्री मराठी पत्रकार संघ अध्यक्ष यांच्या कडे लेखी तक्रार करून या घटनेची माहिती दिली साक्री तालुका मराठी पत्रकार संघ व साक्री प्रेस क्लब साक्री, जन ग्रामीण पत्रकार संघ,सर्व पत्रकार संघटना तसेच यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, साक्री तालुका प्रहार संघटना,धुळे जिल्हा सरपंच परिषद संघटना यांनी दखल घेऊन साक्री शहरात (PIS) सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांची कायद्याच्या नावाखाली दादागिरी, गुंडगिरी वाढलेली, पत्रकारांना शिवीगाळ केल्याबदल, पत्रकार उमाकांत अहिरराव यांच्यावर हल्ला केल्याबदल, साक्री पत्रकार संघटनेने DYSP धुळे ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांना लेखी निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हंटले आहे की,
पीएसआय महेश गायतड यांनी पत्रकार तथा साक्री तालुका मराठी पत्रकार संघ किशोर गादेकर हे अपंग असल्याने त्यांच्या व्यंगावर टीका केली आहे, हात पाय तोडण्याची धमकी दिली आहे, समाजात पोलिसांनी या पद्धतीने वागणे चुकीचे असून पत्रकार संघ पीएसआय गायतड यांचा निषेध करत आहे, फौजदार गायतड यांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, निलंबित करावे अंन्यथा पत्रकार संघ साक्री शहरात मोर्चा काढून साक्री शहर बंद करून उपोषण करेल असे निवेदन देऊन पोलिस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे सांगितले आहे. या घटनेची दखल वरिष्ठ अधिकारी, धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी देखील घ्यावी असे निवेदन देतांना पत्रकार घटनेने म्हंटले आहे,
यावेळी
साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र तोरवणे, मार्गदर्शक विजय भोसले,साक्री प्रेस क्लबचे माजी तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते धीरज देसले, साक्री तालुका प्रहार संघटना अध्यक्ष जयेश बावा, उपाध्यक्ष संजय पाटील,जेष्ठ पत्रकार जी. टी.मोहिते,जन पत्रकार संघ अध्यक्ष प्रकाश वाघ, जेष्ठ पत्रकार जगदीश शिंदे, पत्रकार बी एम भामरे, अरुण अहिराव, पत्रकार दीपक जाधव, लक्ष्मीकांत सोनवणे,अनिल देसले, बाबुहुदीन शहा,अमृत सोनवणे, अंबादास बेणूस्कर, सागर काकूंस्ते,उमाकांत अहिरराव, रतनलाल सोनवणे,संजय बच्छाव, खडूं पवार, योगेश हिरे, जयवंत सास्के, संगपाल मोरे, जगदीश जगदाळे, ज्ञानेश्वर डाल वाले,सूर्यकांत बच्छाव, सचिन सोनवणे, कल्पेश मिस्तरी, विरोध मोरे, शशिकांत अहिराव, सूर्यकांत बच्छाव, तसेच यावेळी साक्री तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना व पत्रकार बांधव, तसेच राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:47 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!