नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नंदुरबार येथील शीतल चौधरी यांचा मुंबई येथे क्वीन लीग गोल्डन अवॉर्डने विशेष गौरव

प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार :- आपल्यावर असलेल्या पारंपरिक जवाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळून विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या महिलांचा मुबंई येथे क्वीन लीग अवॉर्ड २०२२ मध्ये सन्मान करण्यात आला . या मध्ये नंदुरबार येथील सौ . शीतल सतीश चौधरी यांचा विशेष गौरव करण्यात आला . सौ शीतल चौधरी या नंदुरबार शहर तैलिक महिला आघाडीच्या अध्यक्षा असून , गेले अनेक वर्षे लायन्स परिवारात सक्रिय आहेत . पार्लरच्या माध्यमातून उद्योजिका म्हणून ओळख निर्माण करत अनेक मुलींना हे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला आहे . स्वतः अद्ययावत प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबई , दुबई आदी ठिकाणी प्रशिक्षण घेतले आहे . नुकतेच सुरत येथे त्यांना ग्लॅमरस ब्युटी अवॉर्ड फॉरद बेस्ट मेकअप आर्टिस्ट पुरस्कार मिळाला होता . या सर्व यशाची नोंद घेऊन पनाश या सुप्रसिद्ध ब्रँड ने सौ . शीतल चौधरी यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून सन्मानपूर्वक निवड केली आहे . हे सर्व यश मिळवणाऱ्या या भागातील त्या प्रथम महिला आहेत . शीतल चौधरी या उद्योगपती व समाजसेवक अशोक व सौ मीनाताई यांच्या स्नुषा आहेत तर उद्योगपती व लायन्स क्लबचे माजी सचिव सतीश चौधरी यांच्या पत्नी आहेत आपणास मिळालेले यश हे घरच्यांच्या पाठींबा व प्रोत्साहन व साथ यामुळेच लाभले असल्याचे कृतज्ञापूर्वक शीतल चौधरी यांनी व्यक्त केले.या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातन अभिनंदन होत आहे . .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:33 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!