न्यायालयाने दिली तिन दिवसाची वनकोठडी
DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – संदीप सकट
कोल्हापूर :- चंदगड दि. १२/१२/२०२५ रोजी रात्रीचे वेळी मो. कानुर खुर्द येथुन मो. सडेगुडवळे गावच्या हद्दीतील घटप्रभा धरण क्षेत्राजवळ वनविभाग चंदगड चे पथक रात्र गस्त करत असता, त्यावेळी दि.१३/१२/२०२५ रोजीच्या पहाटे सुमारे ००.३० वाजता CHEVROLET BEAT पांढऱ्या रंगाची कार नंबर एमएच १५ ईबी ८९३८ असलेली धरण क्षेत्राजवळ आली. सदर वाहनास वनविभागाचे पथकाने थाबंवून त्याची तपासणी करत असता त्याच वेळी पाठोपाठ ब्राऊन रंगाची रेनॉल्ट डस्टर कार नं एमएच ०४ जीई ०९३८ ही गाडी आली असता तीला हात दाखवुन बैटरीच्या उजेडात थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदरील कार न थांबता रिव्हर्स मध्ये मागे वेगाने काही अंतर जाऊन पुढे सरळ होऊन दहशत माजविण्याच्या उद्देशाने जाऊ लागली. त्याचवेळी थांबलेली पांढऱ्या रंगाची कार नं. एमएच १५ ईबी ८९३८ ही कार रेनॉल्ट डस्टर कार पाठोपाठ भरधाव वेगाने निघुन गेली. त्यावेळी दोन्ही कार तपासणी कामी थांबवण्यासाठी मौ. सडेगुडवळे ते बेळगांव वेगुर्ला रस्त्या दरम्यान वनविभागाच्या पथकाने पाठलाग केला असता सुमारे १.५० ते २.०० किमी अंतरावर मी. सडेगुडवळे गावचे हद्दीतील जळकी व्होळ या स्थानिक नावाने ओळखले जाणाऱ्या रस्त्याकडेला ब्राऊन रंगाची रेनॉल्ट डस्टर कार नं एमएच ०४ जीई ०९३८ वेगाने जात असताना शेतात घुसली. त्यावेळी पांढऱ्या रंगाची कार नंबर एमएच १५ ईबी ८९३८ भरधाव वेगाने दहशत माजविण्याच्या उद्देशाने सदर रस्त्याने पुढे निघुन गेली. थांबलेल्या रेनॉल्ट डस्टर कारची बॅटरीच्या उजेडात वनविभागाचे चंद्रकांत पावसकर (परिमंडळ कानूर खुर्द), वनरक्षक श्रीमती सुरेखा वसंत चाळके, वनरक्षक विकास देवराव राऊत यांच्या पथकाने पाहणी केली त्यावेळी त्या कारमधील अनोळखी इसम अंधाराचा फायदा घेऊन बंदुक शस्त्रासह लगतचे ऊसाचे शेतात पळुन गेल्याचे दिसुन आले. त्यावेळी त्या इसमांचा वनअधिकारी यांनी पाठलाग केला परंतु आरोपीकडे बंदुक शस्त्र असल्याने, अंधारामुळे व उंच ऊसामुळे ते मिळून आले नाहीत.त्यानंतर रस्त्याकडेला थांबलेल्या ब्राऊन रंगाची रेनॉल्ट डस्टर कार ची जवळून रात्रीच्या वेळी बॅटरीच्या उजेडात पाहणी केली असता कारच्या समोर तुटलेल्या नंबर प्लेटवर व मागील बाजुच्या नंबर प्लेट वर एमएच ०४ जीई ०९३८ असा नंबर दिसुन आला. सदर कारची तपासणी केली असता OPPO कंपनीचा ग्रे कलरचा मोबाईल नग-९, ब्राऊन रंगाचे MILLER INDIA असे अक्षर असलेले बंदुक ठेवायची रिकामी केस कवर नग-१, केस कवरच्या साईड पॉकेट मध्ये जिवंत काडतुस/बुलेट्स नग-४, मोठा आकाराचा पिवळा ग्लास असलेला सर्च लाइंट नग-१ त्याला जोडलेल्या निळ्या व काळ्या रंगाच्या १२ फुट वायर, पाठीवर अडकवायच्या बंग (संक) नग-२, दोरी नग-१, सुरी कव्हर नग-१, सुरी नग-१, दातेरी सुरी नग-१, कटर नग-१, मोठा सुरा/सत्तुर नग-१, लांब सुरी नग-१, गोलाकार कानस नग-१, लहान सुरी नग-१ कटर लहान नग-१, मुस्लीम टोपी पांढऱ्या रंगाची नग-१, गडद निळा रंगाचे हात मोजे जोडी नग-१ इत्यादी हत्यारे व काडतुसे मिळून आलेने सदर मुद्देमालासह रेनॉल्ट डस्टर कार नंबर एमएच ०९ जीई ०९३८ जप्त करुन ताब्यात घेण्यात आली आहे. सदर जप्त मुद्देमालाची माल किंमत ५.२१,११५/-इतकी होईल.
कारमधील संशयीत इसम हे वन्यप्राण्याच्या शिकारीचे उद्देशाने आले असलेने कार व त्यामध्ये वरीलप्रमाणे मिळून आलेले हत्यारे जप्त करुन परिमंडळ वनअधिकारी कानुर खुर्द यांनी त्याचे कडील वन अपराध क्र.प्र.गु.रि.नं.डब्लु एल-०१/२०२५ दि.१३/१२/२०२५ चा नोंद केला आहे. वनगुन्ह्याचा तपास तुषार गायकवाड (परिक्षेत्र वनअधिकारी चंदगड), करत असताना तपासामध्ये आरोपी लखन शिवाजी हेगडेरा. माणगाववाडी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर, आरोपी अन्यर इब्राहिम पटेल रा. दानोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर, आरोपी दिगंबर पांडुरंग अनगुडे रा.कानुर खुर्द ता. चंदगड, आरोपी इर्षाद नदाफ रा. दानोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर, आरोपी बचलु नदाफ रा. दानोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर, आरोपी दाऊद अजीज नदाफ रा. दानोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर, आरोपी शाब्गीर दस्तगीर जमादार रा. दानोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर व आरोपी अक्षय हेगडे रा. दानोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर, आरोपी तुकाराम महादेव अमृसकर रा. कानुर खुर्द, आरोपी रियाज दस्तगीर जमादार रा.दानोळी ता. शिरोळ, आरोपी अमीन रहिमबक्ष मुजावर, रा. गंजीमाळ मानेनगर रुकडी, ता. हातकणंगले यांचा सहभाग असलेचे दिसुन आले.
प्रकरणी आरोपी तुकाराम महादेव अमृसकर रा. कानुर खुर्द, आरोपी रियाज दस्तगीर जमादार रा. दानोळी ता. शिरोळ, आरोपी अमीन रहिमबक्ष मुजावर, रा. गंजीमाळ मानेनगर रुकडी, ता. हातकणंगले यांना दि. १४/१२/२०२५ रोजी रितसर अटक करुन त्यांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चंदगड व्ही.एस. अगरवाल यांचे न्यायालयात हजर केले असता सरकारी पक्षातर्फे निता चव्हाण (सरकारी वकील) यांनी वनविभागाची बाजू मांडली मा. न्यायालयाने आरोपी क्र.०१ ते ०३ यांना १९/१२/२०२५ पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
प्रकरणी फरार आरोपी लखन शिवाजी हेगडे रा. माणगाववाडी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर, आरोपी अन्यर इब्राहिम पटेल रा.दानोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर, आरोपी दिगंबर पांडुरंग अनगुडे रा. कानुर खुर्द ता. चंदगड, आरोपी इर्शाद नदाफ रा. दानोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर, आरोपी बबलु नदाफ रा. दानोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर, आरोपी दाऊद अजीज नदाफ रा. दानोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर, आरोपी शाब्गीर दस्तगीर जमादार रा. दानोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर व आरोपी अक्षय हेगडे रा.दानोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर यांचा तपास धैर्यशिल पाटील (उप बनसंरक्षक (प्रा.), कोल्हापुर), विलास काळे (सहाय्यक वनसंरक्षक कोल्हापूर) यांचे मार्गदशनाखाली तीन पथके तयार करुन सुरु आहे. तसेच तुषार गायकवाड (परिक्षेत्र वनअधिकारी चंदगड), चंद्रकांत पावसकर (परिमंडळ वनअधिकारी, कानूर खुर्द), कृष्णा डेळेकर (परिमंडळ वनअधिकारी, चंदगड), वर्षदा पावसकर (परिमंडळ वनअधिकारी, मिरवेल), वनरक्षक सुरेखा वसंत चाळके, वनरक्षक विकास राऊत, वनरक्षक मौलामुबारक सनदी, वनरक्षक आकाश मानवतकर, वनरक्षक कृष्णा शेरे, वनरक्षक राजु धनवई, वनसेवक कृष्णा पोवार तसेच वनपरिक्षेत्र चंदगड कडील सर्व कर्मचारी व वन्यजीव बचाव पथक, कानुर खुर्द, चंदगड, वाहन चालक यांनी कारवाई केली. तसेच सदर गुन्हा प्रकरणी पुढील सखोल तपास सुरु आहे.वन व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन व जैवविविधतेचे जतन करणे आवश्यक असुन वन्यप्राण्यांचे अवैद्य शिकार व अवैद्य वृक्षतोड अवैद्य अतिक्रमण होत असेल तर तात्काळ परिक्षेत्र वनअधिकारी यांचे कार्यालय चंदगड अथवा वनविभाग कोल्हापुर कडे माहिती देणेत यावी आपले नांव गोपनीय ठेवणेत येईल.



