नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अवघ्या १२ तासांत जेरबंद आझादनगर पोलीस ठाण्याची धडक कारवाई

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संदिप अहिरे

धुळे:- धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
दिनांक १७/१२/२०२५ रोजी रात्री १२.३० ते सकाळी ०७.३० वाजेदरम्यान गल्ली नं. ४, शनी मंदिरासमोर असलेल्या रमनलाल पुनमचंद जैन भांडी दुकानात अज्ञात चोरट्याने मोठ्या शटरचे कुलूप तोडून प्रवेश केला. दुकानातील गल्ल्याचे कुलूप फोडून गल्ल्यातील १,८०,००० रुपये रोख तसेच चिल्लर रक्कम असा एकूण सुमारे १,८५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.
या प्रकरणी दुकान मालक सुरेश रमणलाल जैन (वय ६०, व्यवसाय – भांडी विक्री) यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा रजिस्टर नं. २८५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची गंभीर दखल घेत आझादनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.नि. निवृत्ती पवार यांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावरून सदर गुन्हा सद्दाम ऊर्फ बोबड्या दादा रशीद शेख याने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीच्या अटकेसाठी शोध पथकाला आदेश देण्यात आले.
दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा चाळीसगाव चौफुली येथून धुळे शहराबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने त्यास अटक केली. पोलीस ठाण्यात विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीच्या अंगझडतीत गुन्ह्यातील रोख रक्कमपैकी खालीलप्रमाणे रक्कम हस्तगत करण्यात आली –
₹५०० च्या १२१ नोटा – ₹६०,५००
₹२०० ची १ नोट – ₹२००
₹१०० च्या १०० नोटा – ₹१०,०००
👉 एकूण जप्त रक्कम : ₹७०,७००
सदर आरोपीस अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने दिनांक २८/०२/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उर्वरित चोरी गेलेली रक्कम हस्तगत करण्यासाठी तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पो.नि. निवृत्ती पवार, पो.उपनि. समाधान सुरवाडे यांच्यासह
सहाय्यक पोलीस निरीक्षक रफिक पठाण, पोहेकॉ गौतम सपकाळे, योगेश शिरसाठ, शांतिलाल सोनवणे, संदिप कढरे, मनोज बागुल, पो.कॉ. मकसुदखान पठाण व पंकज जोंधळे यांनी सहभाग घेतला.
आझादनगर पोलिसांच्या या तात्काळ व प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:47 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!