नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पत्रकारांशी शिवीगाळ व मारहाणीचा प्रयत्न; दिव्यांग पत्रकाराचा अपमान साक्री पोलीस ठाण्यातील पीएसआयवर कठोर कारवाईची मागणी

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी संदिप अहिरे

धुळे:- साक्री पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांनी पत्रकारांशी केलेल्या

गैरवर्तनाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून, सदर प्रकरणी कठोर कारवाईची मागणी जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्रीकांत धिवरे यांना निवेदन सादर केले आहे.
पत्रकार शरद चव्हाण यांच्याशी झालेल्या वादासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांशी पीएसआय महेश गायतड यांनी अत्यंत उद्धटपणे वर्तन करत हुज्जत घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी पत्रकार किशोर गाडेकर हे दिव्यांग असतानाही त्यांच्या शारीरिक व्यंगावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली, तसेच हात-पाय तोडण्याची उघड धमकी देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
याचप्रसंगी पत्रकार उमाकांत अहिरराव यांच्याशी संवाद साधताना पीएसआय गायतड यांनी पोलीस गणवेशाची मर्यादा ओलांडत स्वतःचा शर्ट काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला व अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार साक्री पोलीस स्टेशनच्या आवारात, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली घडल्याचे सांगण्यात येत आहे.
या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्राच्या वतीने संबंधित पोलीस उपनिरीक्षकास तातडीने निलंबित करून खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग व्यक्तीचा अपमान केल्याप्रकरणी कायदेशीर गुन्हा दाखल करावा, भविष्यात पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळेल याची पोलीस प्रशासनाने खात्री द्यावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे, राज्य कार्याध्यक्ष युवराज देवरे, राज्य जनसंपर्क प्रमुख प्रतीक कुलकर्णी, धुळे जिल्हा संघटक संदीप अहिरे, धुळे तालुकाध्यक्ष संदेश अहिरे तसेच कार्यालयीन सचिव महेश देवरे समस्त सदस्य यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. या प्रकरणाकडे जिल्हा पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:47 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!