नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

टाकली–बोलवड रस्त्यावर थरारक घटना! ऊसाच्या शेतात अज्ञात महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; परिसरात एकच खळबळ

DPT NEWS 🚨दर्शन पोलीस टाईम🚨मिरज प्रतिनिधी राजेंद्र पवार

मिरज:- तालुक्यातील टाकली–बोलवड रस्त्यालगत असलेल्या ऊसाच्या शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर मृतदेह बराच काळ तेथेच पडून असल्याचा अंदाज असून, दुर्गंधीमुळे नागरिकांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले.
घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, प्रत्येक शक्य त्या बाजूने तपास सुरू करण्यात आला आहे.
महिलेचा मृत्यू हा अपघात की घातपात, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसली तरी, मृतदेहाची अवस्था पाहता संशय बळावला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तसेच बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासल्या जात असून, मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत.
या घटनेमुळे टाकली–बोलवड परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस तपासातून लवकरच या रहस्यमय मृत्यूचा उलगडा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:10 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!