नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर एलसीबीची मोठी कारवाई: दुचाकी चोरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक; ३४ मोटार सायकली जप्त

DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी – नारायण कांबळे / संजय दिंडे

कोल्हापूर:- कोल्हापूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) वाहन चोरीच्या गुन्ह्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार संग्राम शिवाजी गायकवाड (वय ४६, रा. मुरगुड, जि. कोल्हापूर) याला अटक करून त्याच्याकडून तब्बल १७ लाख रुपये किमतीच्या ३४ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तपासादरम्यान एलसीबीच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी संग्राम गायकवाड चोरीची मोटार सायकल घेऊन हातकणंगले येथील बौद्ध स्मशानभूमीजवळ येणार आहे. त्यानुसार २० डिसेंबर २०२५ रोजी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.सुरुवातीला एका चोरीच्या स्प्लेंडरसह पकडल्यानंतर, सखोल चौकशीत आरोपीने कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटक राज्यातून एकूण ३३ मोटार सायकली चोरल्याची कबुली दिली. गुन्ह्यासाठी वापरलेली एक आणि चोरीच्या ३३ अशा एकूण ३४ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.आरोपी संग्राम गायकवाड याच्यावर यापूर्वीच दुचाकी आणि चारचाकी चोरीचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या मोटार सायकली विकत घेणारे कुणाल मनोहर कांबळे, सुनील रमेश खोत, पांडुरंग शिवाजी रानमाळे आणि संजय रामचंद्र शिंदे या चार जणांनाही निष्पन्न करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:47 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!