DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे/ संजय दिंडे
कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख श्री. योगेश कुमार यांच्या आदेशानुसार अवैध व्यवसायांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. पन्हाळा तालुक्यातील मरुळी येथील ओढ्याच्या पुलावर सापळा रचून पोलिसांनी विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारी मारुती इको कार जप्त केली असून, दोन इसमांना अटक केली आहे.१४ डिसेंबर २०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार अनिकेत मोरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, करड्या रंगाच्या एका मारुती इको कारमधून विदेशी दारूची अवैध विक्रीसाठी वाहतूक केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने मरुळी (ता. पन्हाळा) येथील पुलावर नाकाबंदी केली.तपासणी दरम्यान संशयास्पद वाटणारी मारुती इको कार (क्र. MH 09 GU 2660) थांबवून झडती घेतली असता, त्यामध्ये विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले.
अटक केलेले आरोपी
या कारवाईत पोलिसांनी खालील दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.संकेत शिवाजी आमकर (वय ४१, रा. अनुस्कुरा, ता. शाहूवाडी),वामन श्रीधर लाड (वय ५०, रा. अनुस्कुरा, ता. शाहूवाडी) चौकशी दरम्यान आरोपींकडे दारू वाहतुकीचा कोणताही परवाना मिळून आला नाही.पोलिसांनी या कारवाईत एकूण ५,७४,८५०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये ७४,०००/- रुपये किमतीची विदेशी दारू.
५,००,८५०/- रुपये किमतीची मारुती इको कार जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सपोनि सागर वाघ, पोलीस अंमलदार अनिकेत मोरे, सचिन जाधव, वसंत पिंगळे, अरविंद पाटील आणि सतिश सुर्यवंशी यांच्या पथकाने केली. याप्रकरणी आरोपी यांच्यावर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



