नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

“ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेस” घोटाळा : 3 वर्षां पासून फरार मुख्य आरोपी अखेर अटकेत

कोल्हापूर LCB चे मोठी कारवाई

DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी — नारायण कांबळे

कोल्हापूर : शेअर मार्केटमधून अधिक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या “ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेस” प्रकरणातील गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेला मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरने केली आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्यात सन 2022 मध्ये नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक 739/2022 नुसार, आरोपींनी गुंतवणूकदारां कडून पैसे स्वीकारून निश्चित कालावधीत १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले, मात्र पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणात भा.दं.वि. कलम 420, 406, 34 तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सोमनाथ मधुसूदन कोळी (वय 36, रा. दैलत नगर, राजारामपुरी, कोल्हापूर) हा सतत ठिकाणे बदलत फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत 25 डिसेंबर 2025 रोजी बेळगाव (कर्नाटक) येथून त्याला अटक केली.
चौकशीत आरोपीने “ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेस”च्या नावाखाली गुंतवणूकदारां कडून पैसे गोळा करून ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याची कबुली दिली आहे. आरोपी विरुद्ध पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा, कोल्हापूर करीत आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता व मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार यांच्या मार्गदर्शना खाली, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.
आर्थिक फसवणुकी विरोधातील लढ्यात कोल्हापूर पोलिसांची ही मोठी कामगिरी मानली जात आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!