DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी सिद्धार्थ वानखेडे✍️📰🗞️✍️
(जन ग्रामिण पत्रकार संघाची बाजी)
अकोला सांगली सातारा व मनमाडचे हे जिगरी दोस्त तसेच जनग्रामिण पत्रकार संघाचे विविध जिल्हाध्यक्ष व जिल्हा समन्वयक
मिलिंद इंगळे अकोला , दौलतराव पाटील सांगली, विशाल शिंदे सातारा व ललित जाधव मनमाड यांना ४ जानेवारी २०२६ ला कोल्हापूर चा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संघर्ष सामाजिक बहु.सेवाभावी संस्था संचलित संघर्ष फाउंडेशन तर्फे संचालक अमोल गावडे यांनी महाराष्ट्रभरातून विविध क्षेत्रातील कर्तबगार हरहुन्नरी व्यक्तींची निवड करून त्यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित केले. कोल्हापूरी फेटा, सन्मान चिन्ह,गौरव पत्र,शाल व ३०००₹ रोख अशा स्वरूपा व्दारे छत्रपती शाहू महाराजांच्या पावन नगरीत तसेच त्यांच्या वंशजांमार्फत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमातकार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार कोल्हापूरचे ऋतुराज दादा पाटीलसो, प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्त धर्मादाय कार्यालय कोल्हापूरचे शिवराज नायकवाडेसो, उप अधिक्षक कारागृह कोल्हापूरचे साहेबराव आडेसो, संपादक कमलाकर वर्टेकर,
विशेष उपस्थिती म्हणून आण्णा महाराज वाटेगावकर व सामाजिक कार्यकर्ते सुधाकर मुंडे
प्रमुख उपस्थिती संभाजी राजे पाटणकर, बयाजी शेळके, प्रा.डॉ, संतोष कोळेकर, विजयानंद पोळ, संजय पटकारे,भगवान कोईगडे, सागर पाटील, प्रविण पाटील, डॉ. त्रिवेणीकुमार कोरे, अन्वि घाटगे, अनिल सुतार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती विविध जिल्ह्यांतून आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तबगार हरहुन्नरी व्यक्तींना सन्मानपूर्वक गौरव करून पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी जन ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा अकोला जिल्हाचे नामवंत गझलकार, पत्रकार, चित्रकार, सिने कलाकार मिलिंद इंगळे यांना कलाविष्कार संस्थे मार्फत केलेल्या राज्यस्तरीय १२ वर्ष निःशुल्क सेवेबद्दल सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, सांगलीचे जनग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक दौलतराव पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, सातारचे जिल्हा समन्वयक विशाल शिंदे यांचे दुर्गामाता चॅरिटेबल ट्रस्ट संस्थे मार्फत महाराष्ट्भर विविध मोफत सामाजिक सेवा दिल्या बद्दल त्यांना पण सामाजिक क्षेत्रातील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच मनमाडचे समन्वयक ललित जाधव यांनी मानवाधिकार मार्फत महाराष्ट्भर कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सर्वांचे महाराष्ट्रभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे तसेच विविध संघटनेकडून सत्कार करून अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी जन ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष- पोलिस राउंडचे संपादक शैलेंद्र साळे सर, प्रदेशाध्यक्ष – परिवहन खबरदारचे संपादक देवानंद अहिरे, तसेच राज्य कार्याध्यक्ष व दर्शन पोलिस टाइमचे संपादक युवराज देवरे सर यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.



