DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी मिलिंद इंगळे
मुर्तिजापूर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला व जिल्हा परिषद अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय थाई बॉक्सिंग स्पर्धा दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी तालुका क्रीडा संकुल, मुर्तिजापूर येथे उत्साहात पार पडली.
या स्पर्धेचे मार्गदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट व क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे तर तालुका क्रीडा मार्गदर्शक विनोद काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती विभाग प्रमुख,मुख्य सामना अधिकारी गंगाधर जाधव यांच्या पुढाकारातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी रिपी पॅनल समीर जाधव,अक्षय भागवत जफरखान,कर्तव्य अग्रवाल मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत विविध वजनगटांमध्ये अमरावती विभागातील खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. विजयी झालेल्या प्रमुख खेळाडूंची राज्यस्तरीय थाई बाॅक्सिंग स्पर्धेत सहभागी संपादन खेळाडू वय 17 वर्ष आतील गट 36 – किलो वजनगटात (मुलं) सैय्यद मोहम्मद, (बडनेरा) ,विनय जामनिक ( मुर्तिजापूर हायस्कूल मूर्तिजापूर ), 40–44 किलो,अंकुश कनोजे,(भारतीय ज्ञानपीठ मूर्तिजापूर) 44–48 किलो, शिवम मोंढे (बडनेरा) 48–52 किलो,अंशुमन सरोदे (गाडगे महाराज विद्यालय, मुर्तिजापूर),52–56 किलो, मंयक जाधव (सेंट झेविअर्स स्कुल ),56–60,लॉरेन सिद्धीकी ( बुलढाणा ), नैतिक चक्रे ( भाऊसाहेब बिडकर विद्यालय अनभोरा ),60–65 किलो,श्रीतेज पालीवाल (मालाणी स्कुल),65–70 किलो पूर्वेश धांडे ( बडनेरा ),70+, आदित्य बोळे( मालाणी स्कूल, मुर्तिजापूर),19 वर्षाआतील वजनगट 60-65 प्रथम – शिवम डहाके,
वजन गट 30-36 ओम जाधव ( मूर्तिजापूर ),40-44 क्रिष्णा वरदानी ( बडनेरा ),44-48 सर्वेश राऊत ( मूर्तिजापूर )17 वर्षा खालील, प्रथम आलेल्या मुली श्रावस्ती पंडीत, पुनम सिरसाट, नंदीनी वरोकार, अक्षरा ढाकरे, मधूरा लोडम, कृष्णाली सतरकर ( बडनेरा),राणी जाधव, दिव्या थोरात स्तुती देवडा ( बडनेरा ), खुशी मेंढे, व्दितीय क्रमांक, पलक भाकरे, समृद्धी दुर्गे ( बडनेरा ), श्रेया लाडोंरे (बडनेरा),19 वर्षाआतील, प्रिया जाधव ( गाडगे महाराज विद्यालय मूर्ति.)
या विजयासह निवड झालेल्या सर्व खेळाडूंना आगामी राज्यस्तरीय थाई बाॅक्सिंग स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करतील, राज्य स्तरावर निवड झालेल्या यशस्वी खेळाडूचे कौतुक होत आहे



