नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ‘ड’ यादीच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या व ग्रामीण आवास योजनांचे अनुदान वाढविण्यात यावे – पं. स.सदस्या सौ.चंदनबाई पानपाटिल

शहादा प्रतिनिधी राहुल आगळे

ग्रामीण आवास योजना पंचायत समितीच्या सर्वसाधारण मासिक सभेत आज वडाळी गणाच्या पं. स. सदस्या सौ. चंदनबाई देवेंद्र पानपाटिल यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या ‘ड’ यादी मध्ये चुकीच्या पध्दतीने अपात्र करणाऱ्या जाचक अटी रद्द करण्याबाबत व प्रधानमंत्री आवास, रमाई व शबरी आवास या ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात वाढ करण्याबाबत मा. प्रधानमंत्री,भारत सरकार यांना शहादा गट विकास अधिकारी आर.बी. घोरपडे, पं.स. सभापती सौ.बायजाबाई भील व उपसभापती सौ. वैशाली पाटिल यांच्याद्वारे निवेदन सादर केले.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या ‘ड’ यादि चा सर्ह्वे करतांना अपात्र करण्यात आलेल्या लोकांकडे मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणारी बोट नसतांना देखील नोंद करण्यात आलेली आहे. तसेच मोटर सायकल हे खेडे गावांत दळणवळणाचे साधन आहे हे असल्यावर अपात्र तसेच घरातील पंखा हा जेमतेम 500 ते 600 रुपयाला मिळतो आणि तो प्रत्येक घरात असतो. अशा किरकोळ वस्तुंसाठी ज्या जाचक अटी घातल्या आहेत त्यामुळे बहुतेक कुटुंबे अपात्र करण्यात आलेली आहेत. रद्द करण्याबाबत निवेदन सादर केले.
सोबत पं.स.सदस्या सौ. बानुमती ताई ईशी(कळंबू गण) काँग्रेस पक्षाचे गटनेते शहादा तालुका संजय गांधी निराधार समिति अध्यक्ष सत्येन वळवी व सर्व पंचायत समिति सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:50 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!