नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नाशिक शहरातील चोरीची वाहने विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

४५ लाखांच्या ५२ मोटारसायकली पोलिसांनी केल्या हस्तगत

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी शांतारामभाऊ दुनबळे

नाशिक : शहरातून मोटारसायकल चोरून त्या वाहनांचे बनावट आरसी बुक व नंबर प्लेट तयार करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नाशिकरोड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४५ लाख रुपये किंमतीच्या चोरीतील ५२ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्तांनी या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पथकाचा विशेष गौरव केला.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश दीपक डावरे (३०, रा. पुष्पक अपार्टमेंट, मंगलमूर्तीनगर, जेलरोड), जावेद इस्माईल शेख (२४, रा. न्यू स्टेशनवाडी, चंद्रमणीनगर,देवळाली कॅम्प), मुस्तफा मोहम्मद शेख (२२, रा. सात आळी, ग्राउंडजवळ, देवळाली कॅम्प) अशी संशयित चोरट्यांची नावे आहेत. नाशिकरोड न्यायालयाबाहेरील पार्किंगमधून लतिफ गुलाब शेख यांची हीरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच १५, डीजी २६६७) एक जानेवारी २०२६ ला चोरीस गेली होती.
या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शोध पथकाचे हवालदार विशाल पाटील यांना २० ते ३०
वयोगटाचे तिघे संशयित विविध जिल्ह्यांत वारंवार मोटारसायकल चोरी करून, तसेच खोटे आर.सी. बुक व खोटी नंबर प्लेट बनवून चोरी केलेल्या मोटारसायकल विक्री करतात. हे त्रिकुट खरेदीदारास बनावट कागदपत्रे दाखवितात.
तिघे संशयित आठ जानेवारीला सिन्नर फाटा येथील सिटीलिंक बसडेपो येथे चोरीच्या मोटारसायकल विक्री करण्याकरिता व्यवहारासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी याबाबत वरिष्ठांना कळवल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी स्वतः तसेच गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, हवालदार सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे यांनी दोन पंचांसह सिन्नर फाटा येथे सिटीलिंक बस डेपोनजीक सापळा रचला. तिघे संशयित आल्यानंतर त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
पोलीस आयुक्तांकडून गौरव
नाशिकरोड पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोटारसायकल चोरीतील टोळीची उकल केल्याबद्दल वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे व हवालदार विशाल पाटील यांचे विशेष कौतुक केले. त्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त संदिपकर्णिक यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून वरिष्ठ निरीक्षक सपकाळे यांनी उत्कृष्ट पोलिसिंग केल्याचे नमूद केले. त्यांच्या नेतृत्वात नाशिकरोड पोलीस स्वतःशीच स्पर्धा करताना एकापेक्षा एक असे डिटेक्शन करत असल्याचे ते म्हणाले. ‘नाशिक जिल्हा… कायद्याचा बालेकिल्ला’ ही संकल्पना सर्वप्रथम सपकाळे यांनी राबवली. नंतर ती संपूर्ण शहरात अंमलात आल्याचे आवर्जून नमूद केले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त संगीता निकम, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ह्या ञिकुटाकडे स्पेलंडर व बुलेट होती तसेच चार
आरसी बुकदेखील मिळून आले. त्यांच्या ताब्यातील दुचाकींच्या नंबर प्लेटची पडताळणी केली असता त्या चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.
पोलीस ठाण्यात तिघांची सखोल चौकशी करून त्यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत तसेच जिल्ह्याबाहेरून चोरलेल्या ४५ लाखांच्या ५२ मोटारसायकली हस्तगत केल्या. चोरी केलेल्या
मोटारसायकली निर्जन ठिकाणी डम्प करून ठेवल्या होत्या. खोटे आरसी बुक व कागदपत्र व बनावट नंबर प्लेट लावून विक्री करण्याची त्यांची तयारी होती. संशयितांनी संगनमताने कटकारस्थान करून चोरीच्या मोटारसायकलची खोटी कागदपत्र तयार करून ग्राहकांची तसेच शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:56 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!