नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बारामती मध्ये विविध ब्रँड चा लाखो रुपयांचा गुटखा जप्त.


बारामती(संतोष जाधव):- काल रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना गुप्त बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की गुणवडी रोड सार्थक कलेक्शन शेजारी श्री दत्त ऑटोलाइन्स या दुकानासमोर गुटखातंबाखू ने भरलेली क्वालिस गाडी उभी आहे अशी बातमी मिळताच त्यांनी शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाला सोबत व त्यांच्या कार्यालयातील पथकाला सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा मारला असता. गणेश दत्तात्रय मदने वय २५ वर्ष राहणार मळद तालुका बारामती हा त्या ठिकाणी विविध ब्रॅण्डचा गुटखा विक्रीसाठी घेऊन आलेला होता दोन पंचांसमक्ष त्याच्यावर छापा मारून त्या ठिकाणी त्याची क्वालिस गाडी क्र MH10AS1999 व विविध ब्रँड चा (विमल गोवा सौदागर V 1) गुटख्याची बोरी मिळून आल्या त्याच्या ताब्यातून गाडी मधून तीन लाख 19 हजार रुपयांचा निव्वळ गुटखा ,पाच लाख रुपये किंमतीची क्वालिस गाडी. दहा हजार रुपयांचा मोबाईल व 26 हजार रुपये गुटखा विक्रीतून आलेले पैसे असा साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर ढाकणे, सुनील मोटे, पोलीस कर्मचारी दशरथ कोळेकर तुषार चव्हाण खांडेकर कोठे. अभिजीत कांबळे ,दशरथ इंगवले व उपविभागीय कार्यालयाकडील कर्मचारी दराडे ,साळवे ,भोई यांनी केलेली आहे आरोपीला अटक करून दोन दिवसाचा पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे या गुन्ह्याला भादवि कलम 328 व अन्न सुरक्षा अधिनियम या प्रमाणे कारवाई केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:07 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!