नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

एमबी रजिस्टरसाठी ४० हजारांची लाच घेताना नगर अभियंता रंगेहात अटकेत.

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – सचिन देसाई

इचलकरंजी :- एमबी रजिस्टर पूर्ण करून देण्यासाठी एकूण दीड लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मुरगूड नगरपरिषदेतील नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई (वय ४७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपये स्वीकारताना ही सापळा कारवाई करण्यात आली.तक्रारदार हे खासगी कंत्राटदार असून त्यांनी हुपरी नगरपरिषद अंतर्गत काम पूर्ण केले आहे. सदर कामाचे एमबी रजिस्टर पूर्ण करून देण्यासाठी आरोपी अभियंत्याने दीड लाख रुपयांची मागणी केली होती. यापूर्वी आरोपीने ५० हजार रुपये स्वीकारल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ पडताळणी केली असता, आरोपीने एकूण १ लाख ३० हजार रुपयांवर तडजोड करून पहिल्या टप्प्यात ४० हजार रुपये घेण्याचे मान्य केले होते.त्यानुसार दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी मुरगूड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वतीने सापळा रचण्यात आला. अभियंता प्रदीप देसाई यांनी तक्रारदाराकडून ४० हजार रुपये स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. पंचासमक्ष आरोपीची अंगझडती व वाहन झडती घेण्यात आली असून, तपासासाठी त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.दरम्यान आरोपीच्या घरझडतीसाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीविरुद्ध मुरगूड पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सापळा पथकामध्ये सुधीर पाटील, संदीप काशीद, कृष्णा पाटील व चालक प्रशांत दावणे यांचा समावेश असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!