नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जयसिंगपूर पोलिसांची मोठी कामगिरी: २.५० लाखांचे चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत. मूळ मालकांना केले परत.

DPT NEWS🗞️📰✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी (सचिन कोळी)

जयसिंगपूर:- जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कामगिरी केली असून, गेल्या काही काळापासून आठवडा बाजार आणि गर्दीच्या ठिकाणांहून गहाळ झालेले विविध कंपन्यांचे २० अँड्रॉइड मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे २,५०,००० रुपये असून, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या हस्ते हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले.सन २०२४-२०२५ या कालावधीत जयसिंगपूर शहर, आठवडा बाजार, एस.टी. स्टँड परिसर आणि प्रवासादरम्यान अनेक नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात नोंद होत्या.गुन्हे शोध पथकाने या प्रकरणाचा तपास हाती घेतला.सायबर पोलीस ठाणे, कोल्हापूर यांच्या मदतीने ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ (CEIR) प्रणालीचा वापर करून गहाळ मोबाईलचे IMEI नंबर ट्रेसिंगवर ठेवण्यात आले होते. तपासादरम्यान हे मोबाईल कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच शेजारील कर्नाटक राज्यातील व्यक्ती वापरत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन हे सर्व २० मोबाईल जप्त केले.ही यशस्वी कारवाई जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस अंमलदार ताहीर मुल्ला, रहीमान शेख, बाळासाहेब गुत्ते कोळी, अमर अडसुळे आणि सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्यामुळे नागरिकांनी जयसिंगपूर पोलिसांचे आभार मानले आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!