नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बिलोली येथे जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई

३ लाखांहून अधिक रोकडसह १६.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

DPT NEWS NETWORK 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी साईनाथ खंडेराय

नांदेड:- परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक मा. श्री. शहाजी उमाप यांच्या निर्देशानुसार बिलोली येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करण्यात आली.
पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. श्रीराम माचेवाड यांच्यासह चार अंमलदारांचे पथक बिलोली येथे पाठविण्यात आले होते. या पथकाने दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.४५ वाजता बिलोली शहरानजीक सावळी रोड येथील प्रताप अंकुशकर याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
या कारवाईत एकूण ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ३,०६,००० रुपये रोकड, एक कार, एक ऑटो रिक्षा, १३ मोटारसायकली व ५ मोबाईल फोन असा एकूण १६ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांची चाहूल लागताच अनेक जुगार खेळणाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, त्यांची वाहने घटनास्थळी आढळून आली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या जुगार अड्ड्यावर तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणावर लोक जुगार खेळण्यासाठी येत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलीस ठाणे बिलोली येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १२/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोहेकॉ श्री. मुद्देमवार हे पुढील तपास करीत आहेत.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. श्रीराम माचेवाड यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेका संजीव जिंकलवाड, पोकों गणेश धुमाळ व पोकों कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर तसेच ‘खबर’ हेल्पलाईन ९१ ५० १०० १०० वर कळवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक मा. श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:47 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!