DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – मिलिंद इंगळे
मूर्तीजापूर: जन ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शैलेंद्र साळे, प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे आणि राज्य कार्याध्यक्ष युवराज देवरे यांनी मूर्तीजापूर दौऱ्यावर असताना स्थानिक पदाधिकाऱ्यांची ‘शिवाश्रय’ हॉटेलमध्ये धावती सदिच्छा भेट घेतली. या निमित्ताने आयोजित छोटेखानी बैठकीत संघटनेची ध्येयधोरणे स्पष्ट करण्यात आली असून, ग्रामीण भागातील पत्रकारांच्या उत्थानासाठी ही संघटना कटीबद्ध असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
विनामूल्य सदस्यत्व आणि पत्रकारांचे हित
बैठकीत मार्गदर्शन करताना शैलेंद्र साळे व इतर मान्यवरांनी सांगितले की, “पत्रकारांना कोणतेही शासकीय मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक बोजा पडू नये, ही संघटनेची प्राथमिक भूमिका आहे. त्यामुळेच जनग्रामीण पत्रकार संघ आय-कार्डपासून ते कोणत्याही कार्यक्रमापर्यंत एक रुपयाही शुल्क किंवा फी आकारत नाही.” पत्रकारांचे हक्क आणि रोजगारासाठी ही संघटना गल्लीपासून दिल्लीपर्यंत सक्रियपणे कार्य करत असून, जास्तीत जास्त पत्रकारांनी नि:संकोचपणे आणि नि:शुल्कपणे या संघटनेत सामील व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
साहित्य संमेलनाच्या यशस्वितेबद्दल पत्रकारांचा सत्कार
कानशिवनी येथे गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांच्या उपस्थितीत पार पडलेले ‘तिसरे राज्यस्तरीय कलाविष्कार मराठी साहित्य संमेलन’ यशस्वी करण्यासाठी पत्रकारांनी दिलेल्या योगदानाची दखल यावेळी घेण्यात आली. जन ग्रामीण पत्रकार संघ आणि कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंडळ, मूर्तीजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपस्थित पत्रकारांना शाल, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख उपस्थितांची उपस्थिती
या बैठकीला आणि सत्कार समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते, त्यामध्ये:
दिपकभाऊ दांदळे (जिल्हाध्यक्ष, सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशन)
मिलिंद इंगळे (जिल्हाध्यक्ष, जन ग्रामीण पत्रकार संघ)
अनिल डाहेलकर (जिल्हा कार्याध्यक्ष)
समाधानभाऊ इंगळे (जिल्हा उपाध्यक्ष)
सुनीलभाऊ वानखडे (जिल्हा संघटक)
विजय इंगळे, प्रफुल्ल भटकर, सौ. भारती इंगळे, सौ. संध्या डाहेलकर, चैताली मॅडम व इतर पदाधिकारी.



