नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कॉपर केबल चोरी करणारी टोळी गजाआड, निजामपुर पोलीसांची धडक कारवाई !

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी अकिल शहा

साक्री : निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील फोफादे गावाचे शिवारात दिनांक ०७/०३/२०२६ रोजी पहाटे ०४.३० वाजेच्या दरम्यान सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस प्रा.ली. कंपनीचे टॉवर क्रमांक जे-३१ मधील २४० स्केअर एम.एम.ची ३६० मीटर एकुण ३,६०,०००/- रुपये किंमतीची कॉपर केंबल वायर चोरीस गेली त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ०५५/२०२६ बीएनएस कलम ३०५,३३१ (४).३२४ (४), ३ (५) प्रमाणे दि ०७/०३/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सपोनि/मयुर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व प्रत्यक्षदर्शी साक्षींदारांना केलेल्या तपासावरुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे १) फैजान रज्जाक खाटीक रा. जैताणे ता. साक्री, २) सुकदेव आनंदा कोळी रा. रजाळे ता. जि. नंदुरबार, ३) अल्तमश शौकत सय्यद रा. निजामपुर ता. साक्री, ४) दिपक पंडीत सोनवणे, ५) पावबा राजु भिल, ६) करण राजु मोरे तिन्ही रा. दुसाणे ता. साक्री जि. धुळे यांना ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयाने पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन त्यांनी तपासादरम्यान त्यांचेकडुन गुन्हा करतांना वापरलेली ईको गाडी क्र. जीजे-०५ आर.जे.-९७२७ व इतर मुद्देमालासह कॉपरकेबल मुद्देमाल असा एकुण ५,४७,०००/- रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. डॉ. अजय देवरे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस.आर.बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि/श्री मयुर भामरे, सपोनि/प्रियदर्शनी थोरात, पोउपनि/मधुकर सोमासे, पोउपनि/यशवंत भामरे, पोहेकों/नारायण माळचे, पोहेकों/रतन मोरे, पोहेकों/प्रशांत ठाकुर, पोहेकों/प्रदिप आखाडे, पोना/खंडेराव पवार, पोकों/सुजीत देवरे, पोकों/सुनिल अहिरे, पोकों/परमेश्वर बव्हाण, पोकों/प्रवीण पवार, पोकों/राकेश महाले, पोकों/गौतम अहिरे, पोकों/मुकेश दुरगुडे, पोकों/टिलु पावरा, पोकों/श्रीराम पदमर, चापोकों/मोहन माळी यांनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:45 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!