नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धाराशीव शहरात महसूल–पोलिसांची धडक कारवाई; अवैध गॅस विक्रीचा अड्डा उध्वस्त

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – परवेज शेख

धाराशिव :- धाराशिव शहरात अवैध गॅस सिलेंडर साठवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. महसूल विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हा प्रकार समोर आला असून, परवान्याविना गॅस साठवणूक करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सहाय्यक महसूल अधिकारी बालाजी पंडितराव ढवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता माहिती मिळाली की,
धाराशिव शहरातील बायपास रोड परिसरात लिमरा हॉटेलजवळ राहुल इंगळे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर साठवून ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अवैध साठा असल्याची माहिती मिळताच महसूल, पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
सुरुवातीला शेड बंद अवस्थेत आढळून आला. संबंधित व्यक्तीला संपर्क साधून घटनास्थळी बोलावण्यात आले. शेड उघडल्यानंतर अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, आत मोठ्या प्रमाणात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर सापडले.
पंचनाम्यानुसार एकूण १६ सिलेंडर जप्त करण्यात आले असून, त्यामध्ये व्यावसायिक, घरगुती आणि छोटे सिलेंडर यांचा समावेश आहे. जप्त सिलेंडरची एकूण किंमत सुमारे २३ हजार २०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
चौकशीदरम्यान संबंधित आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सिलेंडर बेकायदेशीररीत्या साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात गॅस सिलेंडरचा उगम आणि वितरण साखळी तपासण्यासाठी संबंधित एजन्सीशी संपर्क साधण्यात आला असून, आणखी कोणी यात सहभागी आहे का याचाही तपास सुरू आहे.
हा प्रकार आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ आणि एलपीजी नियमांचे उल्लंघन करणारा असल्याने संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
अशा अवैध साठवणुकीमुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:16 pm, March 31, 2026
36°C
कुछ बादल
24 %
5 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 21%
Visibility: 10 km
Sunrise: 6:25 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!