नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धरणगावात दोन बंद घरी फोडली,१ लाख ७८ हजारांचा ऐवज लंपास

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी नितीन ठाकूर

धरणगाव :- शहरांमधील संताजी नगर भागात भरवस्तीत चोरट्यांनी दोन बंद घरांचे कडेकोंडे तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला आहे. २१ मार्चच्या रात्री ते २२ मार्चच्या सकाळच्या दरम्यान ही घटना घडली असून, याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव येथील संताजी नगर (पटेल बेकरी समोर) भागात राहणा-या तक्रारदार अरुणाबाई भाऊराव शिंदे (वय ६५) आणि त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या साक्षीदार उषाबाई ईश्वरलाल चौधरी हे दोघे बाहेरगावी गेले होते. घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. दि. २१ मार्च रोजी रात्री ११ वाजेपासून ते २२ मार्च रोजी सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी या दोन्ही बंद घरांच्या दरवाजाचे कडी-कोंडे तोडून आत प्रवेश केला. घरातील सुटकेस आणि कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून मौल्यवान ऐवज लंपास केला.

चोरट्यांनी दोन्ही घरातून एकूण १,७८,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

याप्रकरणी अरुणाबाई शिंदे यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष काशिनाथ पवार करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:13 pm, March 31, 2026
36°C
कुछ बादल
24 %
5 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 21%
Visibility: 10 km
Sunrise: 6:25 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!