नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सुकळी शेतशिवारातील लाखो रुपयाची केबल चोरट्यांनी केली लंपास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल तपासाला मिळाली गती

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी मिलिंद इंगळे

कानशिवणी : – पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुकळी शेत शिवारात विद्युत पंपाच्या केबल चोरीची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीमुळे शेतकऱ्यांसमोर रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे..
याबाबत प्रदीप भिमराव छबीले (रा. सुकळी नंदापुर) यांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, गावालगत असलेल्या शासकीय तलावातून शेतीसाठी पाणी उचलण्यासाठी सबमर्सिबल पंप बसविण्यात आला होता. पाण्याच्या पातळीनुसार पंपाला जोडलेली पट्टी केबल वाढविण्यात येत होती.
२१ मार्च रोजी सकाळी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी तलावावर गेले असता पंपाला जोडलेली सुमारे ४ हजार फूट लांबीची केबल गायब असल्याचे निदर्शनास आले. सर्व शेतकरी मिळुन पाच ते सहा लाख रुपयांची नुकसान झाल्याचा अंदाज आहे .पाहणीअंती अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी केबल कापून चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेत केवळ छबीले यांच्याच नव्हे, तर गावातील इतर शेतकरी—ज्ञानेश्वर जवंजाळ, शरद पवार, गणेश छबीले, शरद छबीले, सुरेखा सारसे, गजानन छबीले, देवलाल सारसे, निलेश लोडम, ज्ञानेश्वर महले, देवलाल शालीग्राम सारसे, सचिन सासरे, संतोष कडोळे, परमेश्वर साखरे, सतिश वसु, नागोराव उपराट, बाबुलाल सारसे, एकनाथ वाकडे, रमेश सारसे इतर अनेक शेतकऱ्यांच्या पंपांच्या केबल्सही चोरीस गेल्याचे समोर आले आहे. सर्व मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी परिसरात शोध घेतला असता एकाही शेतकऱ्यांची केबल आढळून आले नाही दरम्यान, या प्रकारामुळे शेतीसाठी आवश्यक पाणीपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे सदर गंभीर घटनेची माहिती अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांना कळविण्यात आल्याने त्यांनी लगेच जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना सांगितले त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दखल घेऊन तपासाची गती तीव्र करण्याचे आदेश दिल्याने
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शंकरर शेळके यांनी पथकासह घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. दरम्यान शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पुढील तपासाची दिशा पोलिसांनी तीव्र केल्याचे दिसत असून अखेर चोरटे केंव्हा पोलिसांच्या गळाला लागतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आमदार सावरकर..

शेतकर्यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात सकाळी तक्रार दिली असता पोलिसांनी गुन्हाची नोंद घेतली नसल्याने शेतकऱ्यांनी अकोला पुर्व चे तडफदार आमदार रणधीर सावरकर यांच्या कडे धाव घेतली. आमदार रणधीर सावरकर यांनी घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना दिली असता. बोरगाव मंजू पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील पाहणी करून सायंकाळी गुन्ह्याची नोंद घेतली असल्याने शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला होता.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:20 pm, March 31, 2026
36°C
कुछ बादल
24 %
5 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 21%
Visibility: 10 km
Sunrise: 6:25 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!