नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नारायणगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १२ तलवारी जप्त

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले

नारायणगाव:- पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमांना अटक करून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या सूचनेनुसार रविवार दि.२९ रोजी स्थानिक गुन्हे शाखा जुन्नर विभागाचे पथक नारायणगाव पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सहा.फौजदार दीपक साबळे यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की सालीम साजिद पठाण (वय २० राहणार शिपाई मोहल्ला,जुन्नर) हा त्याच्या ताब्यातील सुझुकी कंपनीची एस्टीम गाडी MH 12 DE 2767 घेऊन नारायणगाव येथे येणार असून त्या गाडीत तलवारी आहेत. मिळालेल्या बातमीवरून गुन्हे शाखा पथक पथक तसेच नारायणगाव पोलीस स्टेशन कडील पथकाने सदर ठिकाणी पंचा समक्ष जाऊन संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव पत्ता विचारले आणि त्याचे नाव सालीम साजिद पठाण राहणार शिपाई मोहल्ला जुन्नर असे सांगितले. त्याच्या गाडीची पंचा समक्ष झडती घेतली असता त्याच्या गाडीमध्ये दहा मोठ्या तलवारी तसेच दोन लहान तलवारी मिळून आल्या.पंचा समक्ष गाडी तसेच बारा तलवारी जप्त केल्या असून सदर बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार अक्षय नवले यांनी नारायणगाव पोस्टे येथे फिर्याद दिली असून त्यावरून नारायणगाव पोस्टे ६०/२०२६ भारतीय शस्त्र अधिनियम १५५९ ४,५(२५) नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास नारायणगाव पोलीस स्टेशन चे पोसई जगदेव पाटील करीत आहेत
सदरची कारवाई पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सपोनि. महादेव शेलार
सपोनि. प्रविण सपांगे

पोसई. जगदेव पाटील
सहा.फौज.दीपक साबळे
पोहवा. संदीप वारे
पोहवा. राजू मोमिन
पोशी. अक्षय नवले, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, मंगेश लोखंडे यांनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:21 pm, March 31, 2026
36°C
कुछ बादल
24 %
5 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 21%
Visibility: 10 km
Sunrise: 6:25 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!