नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

महामार्गावर चालत्या वाहनातून चोरी करणारी टोळी जेरबंद; २४ तासांत तिघांना अटक

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी परवेज शेख

धाराशिव : महामार्गावरून चालत्या मालवाहू वाहनांमधून मालाची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मालवाहतूकदारांमध्ये निर्माण झालेली भीती कमी झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार पथक धाराशिव शहर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संतोष राजेंद्र शिंदे (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) हा आपल्या साथीदारांसह इंदापूर ते वाशी मार्गावरून जाणाऱ्या चालत्या पिकअप वाहनातून तेलाचे डबे चोरी करून ते स्वतःच्या घरी ठेवत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ हालचाल करत संशयिताचा शोध घेतला असता तो येरमाळा येथे आढळून आला. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्याने पापा शंकर पवार (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) व आकाश देवीदास शिंदे (रा. पारा) यांच्यासह इंदापूरजवळ महामार्गावरून जाणाऱ्या चालत्या पिकअपमध्ये चढून चार तेलाचे डबे चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपींकडून ८,९६० रुपये किमतीचे तेलाचे चार डबे तसेच ६३,९६० रुपये किमतीची रेडिऑन कंपनीची मोटरसायकल (चेसिस क्रमांक MD625BK627MIA01176) असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी वाशी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर तसेच चालक पोलीस अमलदार रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:13 am, June 9, 2026
33°C
साफ आकाश
45 %
24 Km/h
Wind Gust: 26 Km/h
Clouds: 5%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!