नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जुन्नरमध्ये रक्ताच्या नात्याला काळिमा; मुलानेच वडील व भावाची दगडाने आणि कपडे धोपाटण्याने ठेचून केली हत्या

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले

जुन्नर (पुणे): पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण घटना समोर आली आहे. बगाडवाडी (पारगाव तर्फे मढ) येथे एका निर्दयी मुलाने आपल्याच वृद्ध वडिलांची आणि लहान भावाची लाकडी चोपणी (कपडे धोपाटणे) व दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण जुन्नर तालुका हादरून गेला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २ जून २०२६ रोजी रात्री २१:०० ते ३ जून २०२६ रोजी पहाटे ०८:०० च्या दरम्यान बगाडवाडी येथील लक्ष्मण गोविंद कदम यांच्या शेतातील पत्राशेडमध्ये घडली. आरोपी बाबजी जयराम मुकणे (वय ३२) याने त्याचे लग्न लावून दिले नाही, या कारणावरून संतापून आपल्या वडील जयराम महादु मुकणे (वय ६५) आणि भाऊ राजु जयराम मुकणे (वय ३०) यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याने त्यांना हातातील कपडे धोपाटण्याने (लाकडी चोपणीने) बेदम मारहाण केली आणि त्यानंतर दोघांच्याही डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केली.
पोलिसांची तत्पर कारवाई
या घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयताचा मुलगा युवराज जयराम मुकणे याने दिलेल्या फिर्यादीवरून ओतूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी बाबाजी जयराम मुकणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओतूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला जेरबंद केले असून, त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
तपासाचे पथक
सदर गंभीर गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे:
मार्गदर्शक अधिकारी:
मा. संदीपसिंह गिल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)
मा. शुभम कुमार (अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)
मा. धनंजय पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर विभाग)
तपास पथक (ओतूर पोलीस स्टेशन):
प्रभारी अधिकारी: सहा. पोलीस निरीक्षक (API) ज्ञानेश्वर बाजगिरे हे या गुन्ह्याचा मुख्य तपास करत आहेत.
तपास पथक: त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक (PSI), सहाय्यक फौजदार (ASI), हवालदार (HC) आणि पोलीस कॉन्स्टेबल (PC) यांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाद्वारे घटनास्थळाचा पंचनामा, हत्या करण्यात वापरलेली हत्यारे (दगड व धोपाटणे) जप्त करणे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवणे ही कार्यवाही सुरू आहे.
कौटुंबिक वादाची किनार
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत व्यक्तींमध्ये जमीन, पैसा आणि कौटुंबिक कलहावरून वारंवार वाद होत होते. लग्न न झाल्याच्या रागातून आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले असले, तरी हत्येमागील इतर कारणांचाही पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:52 am, June 9, 2026
30°C
साफ आकाश
58 %
24 Km/h
Wind Gust: 30 Km/h
Clouds: 9%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!