नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चोरीची दुचाकी जप्त

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी परवेज शेख

धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीची मोटारसायकल ताब्यात बाळगणाऱ्या आरोपीस अटक करून त्याच्याकडून सुमारे २० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल जप्त केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि. ४ जून २०२६ रोजी मालमत्तेविषयक गुन्ह्यांतील आरोपींची माहिती घेत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस ठाणे धाराशिव शहर हद्दीतील आठवडी बाजार परिसरात एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन थांबलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ सापळा रचून संबंधित इसमास ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने आपले नाव आशिष उर्फ संतोष शंकर पारेकर असे सांगितले. त्याच्या ताब्यातील मोटारसायकलबाबत विचारणा केली असता, सदर दुचाकी चार महिन्यांपूर्वी धाराशिव येथील समर्थनगर परिसरातून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून अंदाजे २० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल जप्त केली.
पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीस चोरीच्या मोटारसायकलसह आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, राहुल नाईकवाडी, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शोभा बांगर तसेच चालक पोलीस अंमलदार दहीहंडे यांनी सहभाग घेतला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:52 am, June 9, 2026
30°C
साफ आकाश
58 %
24 Km/h
Wind Gust: 30 Km/h
Clouds: 9%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!