नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चारचाकी नावावर करून देण्याचे सांगून तरुणाची चार लाखाची फसवणूक.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – संदीप सकट

 

कोल्हापूर, चंदगड :- तामिळनाडू पासिंगची चारचाकी गाडी आपल्या नावावर करून देण्याचे सांगून एका तरुणाचा विश्वास संपादन करत त्याच्याकडून तब्बल चार लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार चंदगड तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात एका व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरिष अजिज शेख (वय २०, व्यवसाय काजू फॅक्टरी, रा. शिनोळी, ता. चंदगड, मूळ रा. पेनूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकाश भालचंद्र देसाई (रा. ग्रीन हिल रिसॉर्ट, कोदाळी, ता. चंदगड) याच्याविरुद्ध गुन्हा रजि. नं. २८६/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तामिळनाडू पासिंगची व दुसऱ्याच्या नावावर असलेली पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार (क्र. TN 01 BW 5251) फिर्यादीच्या नावावर आठ दिवसांत करून देतो, असे सांगितले. या आश्वासनावर विश्वास ठेवून फिर्यादीने सदर कार चार लाख रुपयांना खरेदी करण्याचे मान्य केले.

त्यानंतर फिर्यादीकडून १ लाख ५० हजार रुपये ऑनलाइन तर २ लाख ५० हजार रुपये रोख, असे एकूण चार लाख रुपये घेण्यात आले. मात्र पैसे स्वीकारल्यानंतरही संबंधित वाहन फिर्यादीच्या नावावर करून देण्यात आले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही गाडी नावावर न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणात आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने विश्वास संपादन करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुन्हा २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, स्था. गु.शा., कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:20 am, August 29, 2026
27°C
घनघोर बादल
67 %
22 Km/h
Wind Gust: 30 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:13 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!