नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

यशवंतनगर येथे दोन दुचाकींची धडक एक गंभीर जखमी.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – संदीप सकट चंदगड

 

कोल्हापूर, चंदगड:- यशवंतनगर येथील तालुका संघासमोरील बेळगाव–वेंगुर्ला मार्गावर दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी चंदगड पोलिस ठाण्यात २६ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी टोपान्ना कडोलकर (रा. सुपे, ता. चंदगड) हे स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH-09-GE-0850) वरून यशवंतनगर येथे डॉक्टरांकडे उपचारासाठी आले होते. उपचारानंतर ते आपल्या गावी सुपे येथे बेळगाव–वेंगुर्ला मार्गाने जात असताना तालुका संघासमोरील रस्त्यावर मागून आलेल्या होंडा अॅक्टिव्हा (क्र. KA-05-AL-7707) ने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.या अपघातात तानाजी कडोलकर यांच्या डोक्याला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून ते बेशुद्ध झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच त्यांच्या मोटारसायकलचेही नुकसान झाले आहे.

याप्रकरणी कल्लाप्पा टोपान्ना कडोलकर यांनी चंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विजापूर, कर्नाटक येथील नवीन बसवराज हणमारेड्डी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(२) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:20 am, August 29, 2026
27°C
घनघोर बादल
67 %
22 Km/h
Wind Gust: 30 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:13 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!