नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नंदुरबार येथे पोलीसांचे कर्तव्यात अडथळा निर्माण करुन शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या महिला आरोपीतांना न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

प्रतिनिधी.
प्रा. भरत चव्हाण
तळोदा

नंदुरबार -नंदुरबार येथे जि.प. उपोषण दरम्यान तब्बेत खालावल्याने पोलीस रुग्णालयात घेवुन जात असतांना पोलीसांचे कर्तव्यात अडथळा निर्माण करुन शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या महिला आरोपीतांना न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , दि . ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पासुन सुरेखा आधार बोरसे नामक महिला जिल्हा परिषद कर्मचारी ही आमरण उपोषण कामी बसलेली होती . सदर दिवशी त्या ठिकाणी फिर्यादी महिला पोलीस अंमलदार बबिता नुरजी देसाई व कलावती वसावे तत्का , नेम.नंदुरबार शहर अशांना डयुटी बंदोबस्त रात्री ०८.०० वाजेपासुन लावण्यात आलेला होता . त्याच वेळेस पोनि नितीन चव्हाण तत्का , नेम , नंदुरबार शहर हे देखील त्यांचे पोलीस स्टाप सह हजर होते . जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री . बागुल व त्यांचे सहाय्यक श्री . पाटक आणि पोनि नितीन चव्हाण असे जिल्हा परीषद आवारात उपोषणकर्ती महिला नामे सुरेखा आधार बोरसे हिस उपोषण सोडणे बाबत व तिला निलंबित केल्याचे कारण समजावुन सांगत असतांना सुरेखा बोरसे हिने ” मी उपोषण सोडणार नाही ” असे सांगुन टोमणे मारत होती . सुरेखा आधार बोरसे हिची तब्बेत खालावल्याने तिला श्री . बागुल यांनी वैद्यकीय उपचार घेणे करीता विनंती केली असता तिने उपचारास देखील नकार दिला होता . सिव्हील हॉस्पीटल येथील वैद्यकीय अधिकारी यांना जागेवरच बोलावुन सुरेखा हिस तपासले असता डॉक्टरांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करणे बाबत तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना सल्ला दिला होता . उपोषण सोडण्यास व रुग्णालयात दाखल होण्यास सुरेखा हिने नकार दिल्याने तिला उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांनी बळाचा वापर करीत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता , त्याच वेळेस सुरेखा आधार बोरसे हिची मुलगी हर्षदा सुधीर पाटील व आई कोकीळा आधार बोरसे यांनी पोलीसांना मज्जाव करत पोनि चव्हाण यांचे अंगावर मारण्याच्या उद्येशाने धावत येवुन वाईट वाईट शिवीगाळ केली होती . तसेच हर्षदा पाटील हिने मोबाईल मध्ये पोलीसांची व्हीडीओ शुटींग करत खोटया तक्रारी करण्याच्या धमक्या दिल्या होत्या . नंतर हर्षदा पाटील व कोकीळा बोरसे यांना ताब्यात घेवून पोलीस गाडीत बसवितांना हर्षदा पाटील हिने फिर्यादी महिला पोलीस अंमलदार बविता नुरजी देसाई यांना वाईट वाईट शिवीगाळ करत चापटीने मारुन , उजव्या हातास चावा घेत ९ ते १० गोळया घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता . वैद्यकीय अधिकारी यांनी उपोषणकर्ती आरोपी महिला सुरेखा आधार बोरसे हिची प्रकृती अधिक खालावु शकते असे पत्र दिल्याने तिला बळाचा वापर करत शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार कामी दाखल केले होते . अश्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाणेत वरील तिनही महिला आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर खटल्याची सुनावणी मा . श्री . आशुतोष भागवत , अति . जिल्हा व सत्र न्यायाधीश सो , नंदुरबार यांचे कोर्टात होवुन आरोपी क्र . १ ) सुरेखा आधार वोरसे २ ) हर्षदा सुधीर पाटील ३ ) कोकीळा आधार घोरसे सर्व रा . वावद ता . जि . नंदुरबार यांचेविरुद गुन्हा साबीत झाल्याने मा . न्यायालयाने भा.द.वि.क. ३५३,३५१ , ३४ अन्वये आ.क्र . ९ ) सुरेखा हिस ६ महिने साधा कारावास व रुपये १००० / – दंड , आ.क्र .३ ) कोकीळा हिस १ महिना कारावास व रुपये १००० / – दंड अशी शिक्षा सुनावली आहे . तर आरोपी क्र . २ ) हर्षदा सुधीर पाटील हिची शिक्षा जिल्हा परीविक्षा अधिकारी यांचे कार्यालयातुन अहवाल सादर केल्या नंतर ठोठावण्यात येणार आहे . वरील गुन्हयाचा सखोल तपास करुन आरोपी विरुध्द मा . न्यायालयात दोषा रोपपत्र तत्कालीन पोलीस निरीक्षक एस . आर . मथुरे यांनी सादर केले होते . सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील ऍड . श्री . वी . यु . पाटील यांनी पाहीले आहे . तसेच सदर खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ नितीन सावळे व पोना गिरीश पाटील यांनी कामकाज केले आहे . वरील सर्वांचे मा . पोलीस अधीक्षक व मा . अपर पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:12 pm, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 41 %
Wind 13 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!