नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

संकल्प वाचनालयात शिवजयंती साजरी.

धुळे प्रतिनिधी:- धुळे : संकल्प वाचनालयात शिवजयंती साजरी.
“शिवरायांची कर्तृत्वक्षेत्रे आदर्शांचे प्रतिक होत”
प्रा. अण्णा माळी
“नितीशास्त्र, न्यायशास्त्र, राज्यशास्त्र, संरक्षणशास्त्र, वास्तुशास्त्र, स्थापत्यशास्त्र, कृषिशास्त्र, समाजशास्त्र आणि प्रशासनतंत्रांसह विविध शास्त्रांचे ज्ञानीच नव्हेत तर प्रत्यक्ष अंमलबजावणीकार शिवरायांची कर्तृत्वक्षेत्रे अवर्णनीय होत. महिला सबलीकरण आणि मातृदेवोभवचा आदर आणि आदर्श शिवरायांची चारित्रिक नीतिमूल्ये स्पष्ट करतो. अभेद्य आणि प्रचंड अशा गड किल्ल्यांची बांधणी आणि निर्मिती त्यांचे वास्तु आणि स्थापत्यशास्त्रांचे ज्ञान दर्शवते गनिमी काव्याने लढलेल्या लढाया व वेळोवेळी वापरलेली युद्धतंत्रे त्यांचे यद्धशास्त्र आणि संरक्षणशास्त्राचे ज्ञान प्रगट करतात. बारा बलुतेदार आणि जिवलग मावळ्यांची त्यांना लाभलेली साथ त्यांचे समाजशास्त्रीय वर्तन दर्शवते. कृषिबलांना पूरक धोरण त्यांची शेतकर्‍यांबद्दलची कणव आणि आस्था स्पष्ट करते. शिवरायांची समाधी शोधून प्रथम शिवजयंती साजरी करणारे व शिवरायांवर पोवाडा लिहिणारे म. फुले केवळ शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारकच नसून ते शिवशाहीरही होत. त्यांचा शिवरायांवरील पोवाडा शिवचरित्राची समर्पक पावतीच होय. “असे प्रतिपादन खान्देश माळी महासंघ प्रबोधन समिती अध्यक्ष प्रा. अण्णा माळी यांनी केले. येथील संकल्प वाचनालयात शिवजयंती उत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. शिवरायांचे विविधांगी चरित्र गुण अंगिकारण्याचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमप्रसंगी त्यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करुन सर्वांनी शिववंदन केले. मनपा नगरसेविका सन्मा. सौ. भारतीताई अशोक माळी यांचा “शेतकर्‍याचा असूड” हे पुस्तक व शाल श्रीफळ देऊन वाचनालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर महाजन यांनी सत्कार केला. कार्यक्रमास उद्यानपंडित श्री. विलासराव माळी, अ. भा. माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विलासराव पाटील, ओ. बी. सी. आरक्षण समिती प्रमुख श्री. दिलीप आप्पा देवरे, दैनिक शब्दगंगाचे संपादक श्री. देवेन्द्रबापू पाटील, श्री. आसाराम माळी, श्री. अशोक बापूजी जाधव, श्री. भाऊसो. प्रदीप भामरे, समता परिषद महानगर कार्याध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर माळी, श्री. महेंद्र जगताप सर, श्री. भटु सूर्यवंशी, श्री. प्रविण सूर्यवंशी, श्री. लावण्य सूर्यवंशी, श्री. स्वामी सूर्यवंशी, श्री. पवन माळी, श्री. गणेश माळी, सौ. जयाताई माळी, सौ. शकुंतलाबाई सूर्यवंशी यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.
*प्रा अण्णा माळी
M. A._Eng. /Hin. /Mar. /B. Ed.
अध्यक्ष
खान्देश माळी महासंघ
प्रबोधन समिती.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:07 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!