नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आयशरने ट्रॅक्टरला दिली धडक एकाचा मृत्यू पाच जखमी

DPT NEWS:- शेतातून ऊस भरून भरधाव वेगाने जाणाऱ्या  आयशरने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने ऊसाखाली दाबल्या गेल्याने ट्रॅक्टर मधिल एकाचा जागिच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाल्याची घटना आज 23 फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास सुमारास घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे.मध्यप्रदेश कडून ऊस भरून धुळ्याकडे जाणाऱ्या भरधाव आयशरने शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात ऊसाखाली दाबल्या गेल्याने ट्रॅक्टर मधील अर्जुन हसरत भील वय 30 रा. कुरखळी यांचा जागिच मृत्यू झाला तर राजु पुजु भिल वय 32 वर्ष,छगन बळीराम भिल वय 42 वर्ष,दयाराम देवराम भिल वय 46 वर्ष,भाईदास रामदास भिल वय 45 वर्ष यांच्यासह आयशर चालक राहुल जाजुराम जाधव वय 26 असलपुर ता.महु जि.इंदौर जखमी झाले आहेत.जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:51 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!