प्रतिनिधी.
प्रविण चव्हाण
नंदुरबार -नंदुरबार येथे मागील भांडणाचा कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून महिलेसह कुटुंबाला काठयांनी मारहाण केल्याची घटना घडली . यात दोनजण जखमी असून मोटरसायकलीचे नुकसान झाले आहे . याप्रकरणी नंदुरबार पोलीस ठाण्यात दोन जणांसह अल्पवयीन बालकाविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे .
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नंदुरबार शहरातील कंजरवाडा भागात दि . २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान मागील भांडणाच्या कारणावरून प्रविण गुमाने यांनी गैरकायद्याची मंडळी जमवत अनिल काशीकर व त्यांच्या पत्नीला जबर मारहाण केली . यात अनिल काशिकर व रिनाकाशीकर यांना दुखापत झाल्याने त्यांनी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .
याप्रकरणी अनिल शांतीलाल काशिकर रा . कंजरवाडा ( ता . नंदुरबार ) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात प्रविण गुमाने , मंदा गुमाने , आशिष घमंडे , पवन चंदन गुमाने , निखील लालुबाई राठोड , विकास रूपसिंग घमंडे सर्व रा . रा . कंजरवाडा ( ता . नंदुरबार ) यांच्या विरुध्द भादंवि कलम १४३ , १४४ , १४७ , १४८ , १४ ९ , ३२६ , ४२७ महापोलीस कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी निखील लालुबाई राठोड , विकास रूपसिंग घमंडे व एका अल्पवयीन युवकास अटक करण्यात आली आहे .
याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत .



